Jitendra Awhad On Malhar Certification : (म्हणे) ‘मल्हार’ मटण म्हणजे प्रसिद्धीसाठी केलेला ‘स्टंट’ !’ – आमदार जितेंद्र आव्हाड

  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे अतार्किक विधान !

  • ‘मल्हार’, ‘झटका’ किंवा ‘हलाल’ मटणाचा गुणवत्तेवर परिणाम होत नसल्याचाही केला दावा !

आमदार जितेंद्र आव्हाड व मंत्री नितेश राणे

मुंबई – ‘हलाल’ हे धार्मिक प्रमाणपत्र आहे. ते ‘हायजिन’ (आरोग्याचे) प्रमाणपत्र नाही. हिंदूंना हलाल मांस खाणे बंधनकारक नाही. जसजसा काळ पालटला, खाण्याच्या पद्धती पालटल्या, तरीही भारतातील ९५ टक्के लोक मांसाहार करतात. त्यांना जर विचारले की, तुम्ही आणलेले मटण ‘हलाल’ आहे कि ‘झटका’ ? तर त्यांना ते सांगता येणार नाही. त्यामुळे एखाद्या मटणाला ‘मल्हार’ मटण म्हटले काय, ‘झटका’ मटण म्हटले काय किंवा ‘हलाल’ मटण म्हटले काय, त्याचा फारसा परिणाम मटणाच्या गुणवत्तेवर होणार नाही अन् खाणार्‍यावरही होणार नाही. त्यामुळे हा केवळ प्रसिद्धीसाठी केलेला ‘स्टंट’ (दिखाऊपणा) आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले. (तिन्ही संकल्पनांची मुद्दामहून सरमिसळ करून हिंदूंची फसवणूक करायची आणि मुसलमानांना मात्र पाठबळ द्यायचे, हे आव्हाड महाशयांना चांगले जमत असले, तर हिंदू आता सतर्क झाले आहेत, हे आव्हाड यांनी लक्षात ठेवावे ! – संपादक) मटणातील भेसळ रोखण्यासाठी ‘मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम’ संकेतस्थळाचे उद्घाटन मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या पार्श्‍वभूमीवर आव्हाड यांनी वरील विधान केले.

आम्ही शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारसरणी पाळणार ! – आमदार अमोल मिटकरी

आमदार अमोल मिटकरी

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले, ‘नितेश राणे यांना मी काय बोलावे ? ‘मल्हार’ मटणाविषयी ते जे बोलत आहेत, ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. आमची विचारसरणी शाहू, फुले, आंबेडकर यांची आहे आणि आम्ही ती पाळत राहू.’’

‘हलाल’ आणि ‘झटका’ मांस यांतील भेद !

हलाल मांस म्हणजे प्राण्यांचे तोंड मक्केच्या दिशेला करून त्यांच्या गळ्याची नस चिरली जाते आणि त्यांना तडफडत मरू दिले जाते. त्यात प्राण्यांचे रक्त मोठ्या प्रमाणात वहाते. याउलट हिंदु किंवा शीख धर्मांमध्ये ‘झटका’ पद्धतीने प्राण्यांची हत्या केली जाते. त्यात प्राण्यांची मान एकाच घावात कापली जात असल्याने त्यांना अल्प प्रमाणात त्रास होतो.

संपादकीय भूमिका

  • हलाल यंत्रणा केवळ खाण्याच्या संदर्भात अस्तित्वात नसून त्या यंत्रणेद्वारे गोळा केलेले पैसे आतंकवाद्यांना पुरवले जातात, असे समोर आले आहे. या माध्यमातून भारताच्या इस्लामीकरणाचे पद्धतशीर षड्यंत्र रचले जात आहे. ही अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्थेच्या मुळावर उठलेली आहे. त्यामुळे ती वेळीच संपुष्टात आणायला हवी !
  • ‘मल्हार’, ‘झटका’ किंवा ‘हलाल’ मटण ही प्रत्येक संकल्पना भिन्न असतांना अशा प्रकारे बिनबुडाचे आरोप करून आव्हाड स्वतःचेच हसे करून घेत आहेत, असे म्हटल्यास वावगे काय ?