(म्हणे) ‘ब्राह्मण भारतीय नाही, तर रशिया आणि युरोपीय देशांतून आले आहेत !’ – RJD Leader Yaduvansh Kumar Yadav

राष्ट्रीय जनता दलाचे माजी आमदार यदुवंश कुमार यादव यांचा ब्राह्मणांवर टीका करणारा जुना व्हिडिओ पुन्हा प्रसारित

राष्ट्रीय जनता दलाचे माजी आमदार यदुवंश कुमार यादव

पाटलीपुत्र (बिहार) – सध्या बिहारमध्ये सामाजिक माध्यमांत एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. हा व्हिडिओ २९ एप्रिल २०२३ या दिवशीचा आहे; पण राज्यातील विधानसभेच्या निवडणुका जवळ येताच हा व्हिडिओ पुन्हा एकदा प्रसारित झाला आहे. यात राष्ट्रीय जनता दलाचे माजी आमदार यदुवंश कुमार यादव ब्राह्मणांविषयी वादग्रस्त विधान करतांना दिसत आहेत. त्यांनी म्हटले की, डीएन्ए (डीऑक्सीरिबो न्यूक्लिक ॲसिड, म्हणजे व्यक्तीची मूळ ओळख पटवणारे शरिरातील घटक.) चाचण्यांमधून असे दिसून आले आहे की, कोणताही ब्राह्मण या देशातील नाही. ते रशिया आणि इतर युरोपीय देशांमधून येथे येऊन स्थायिक झाले आहेत. ब्राह्मण आपल्यात फूट पाडून राज्य करण्याचा प्रयत्न करतात. आपण ब्राह्मणांना येथून हाकलून लावावे. यादव समुदाय मूळचा भारतातील आहे.

संपादकीय भूमिका

तोंड आहे म्हणून काहीही बरळणारे पूर्वी आमदार होते, हे त्यांना निवडून देणार्‍यांना लज्जास्पद ! अशा प्रकारची विधाने करणार्‍यांना कारागृहात डांबले पाहिजे !