७१ सहस्र कोटींच्या घोटाळ्याच्या प्रकरणी पुण्यातील सहकारी बँकेवर अंमलबजावणी संचालनालयाची धाड

घडणार्‍या गुन्ह्यांत राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नेते सापडण्याचे प्रमाणे अधिक असल्याने गुन्हेगारांचा भरणा असलेला पक्ष असे नाव दिल्यास त्यात चूक काय ?

राज्याचे मंत्री कायद्यापेक्षा मोठे नाहीत ! – अनिल देशमुख

भाजपकडून धनंजय मुंडे यांना लक्ष करत त्यांच्या त्यागपत्राची मागणी करण्यात येत आहे, तसेच सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी १४ जानेवारी या दिवशी धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.

धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध तक्रार करणार्‍या महिलेची माघार

राष्ट्रवादीचे नेते आणि  सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध बलात्काराची तक्रार करणार्‍या महिलेने आपण माघार घेत असल्याचे टि्वट केले आहे. या महिलेने टि्वटमध्ये म्हटले आहे की, तुमची सर्वांची इच्छा असेल, तर मी माघार घेते आहे. एक काम करा तुम्ही सर्वांनीच मिळून निर्णय घ्या.

पक्षातील सहकार्‍यांना विश्‍वासात घेऊन मुंडे यांच्याविषयी निर्णय घेऊ ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

धनंजय मुंडे यांनी एका महिलेवर अत्याचार केल्याचे आरोप गंभीर आहेत.-शरद पवार

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची बैठकीत चर्चा नाही

धनंजय मुंडे यांच्यावर होणारे आरोप गंभीर आहेत याविषयी चर्चा होत आहे.

सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणे योग्य नाही ! – जयंत पाटील

कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणे योग्य नाही. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या वरील आरोपांविषयी भूमिका स्पष्ट केली आहे, असे  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. नगर येथील एका कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महिलेने केलेले सर्व आरोप खोटे असून माझी अपकीर्ती करणारे आहेत ! – धनंजय मुंडे, सामाजिक न्याय मंत्री

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचे आरोप करून मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात मुंडे यांच्याविरुद्ध तक्रार प्रविष्ट केली होती; मात्र मुंडे यांनी या महिलेचे आरोप फेटाळून लावले आहेत.

महाराष्ट्राचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांची एन्.सी.बी.कडून चौकशी

या प्रकरणाची सरकारने तात्काळ नि:पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असेच जनतेला वाटते !

सामाजिक न्याय !

याच देशात मर्यादापुरुषोत्तम, एकवचनी, एकपत्नी प्रभु श्रीराम यांनीही राज्य केले आहे. आदर्श राज्यकारभाराचा वस्तूपाठच त्यांनी घालून दिला आहे. कुठे मर्यादापुरुषोत्तम श्रीराम आणि कुठे सध्याचे राजकारणी ? यावरून तरी देशात रामराज्याची अर्थात् हिंदु राष्ट्राची का आवश्यकता आहे, ते लक्षात येते !

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांनी घेतली खासदार शरद पवार यांची भेट

अभिनेता सोनू सूद यांच्यावर येथील महापालिकेकडून अनधिकृत बांधकाम केल्याच्या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. त्यातच १३ जानेवारी या दिवशी सोनू सूद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी सकाळी भेट घेतली. या वेळी सूद यांनी पवार यांच्याशी चर्चा केली.