धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची बैठकीत चर्चा नाही

जयंत पाटील व धनंजय मुंडे

मुंबई – धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची पक्षाच्या बैठकीत चर्चा झालेली नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिले आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर होणारे आरोप गंभीर आहेत याविषयी चर्चा होत आहे. पोलिसांच्या कामात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, पोलीस त्यांचे काम करतील. मुंडे यांना ब्लॅकमेल केले जात होते. याविषयी त्यांनी पोलिसात तक्रार केली आहे. पोलीस जो निष्कर्ष काढतील त्यानंतर अंतिम निष्कर्ष काढला पाहिजे, असेही पाटील यांनी सांगितले.

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचं स्वरुप गंभीर आहे. यावर पक्ष म्हणून विचार करावा लागेल. धनंजय मुंडे यांनी मला सांगितलेली माहिती पक्षातील इतर सहकार्‍यांना देणे हे माझे कर्तव्य आहे. याबाबत पक्षातील इतर सहकार्‍यांशी चर्चा करू आणि पक्ष म्हणून निर्णय घेऊ. याला जास्त वेळ लागेल, असे वाटत नाही. पक्षप्रमुख म्हणून जे काही निर्णय घ्यावे लागलीत ते तातडीने घेऊ, असे शरद पवार यांनी दुपारी म्हटले होते; मात्र सायंकाळपर्यंत कोणताही निर्णय घेतला नाही.