महाराष्ट्राचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांची एन्.सी.बी.कडून चौकशी

या प्रकरणाची सरकारने तात्काळ नि:पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असेच जनतेला वाटते !

मुंबई – राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ने (एन्.सी.बी.ने) (ड्रग्जची तस्करी आणि अमली पदार्थांचा दुरुपयोग यांच्या विरोधात काम करणारा अन् अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याची कार्यवाही करणारा नोडल अन् गोपनीय विभाग) १२ जानेवारी या दिवशी समन्स पाठवले होते. एन्.सी.बी.ने १३ जानेवारी या दिवशी समीर खान यांची एन्.सी.बी.च्या कार्यालयात चौकशी केली. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर करण सजनानी याला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीत समीर खान याचे नाव उघड झाले होते. या प्रकरणावर नवाब मलिक यांनी भाष्य करण्यास नकार दिला.