सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणे योग्य नाही ! – जयंत पाटील

डावीकडून जयंत पाटील आणि धनंजय मुंडे

मुंबई – कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणे योग्य नाही. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या वरील आरोपांविषयी भूमिका स्पष्ट केली आहे, असे  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. नगर येथील एका कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, राजकारणात आयुष्य उभे करायला, राजकीय स्तरावर यायला अनेक कष्ट घ्यावे लागतात. मुंडे यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात यापूर्वीच अर्ज प्रविष्ट केला आहे. हा न्यायालयीन आणि अंतर्गत कुटुंबातील विषय आहे. कोणीही आरोप केले म्हणजे अंतिम निष्कर्षला पोचणे योग्य नाही. मुंडे यांच्यावरील आरोपांची चौकशी होईल, खुलासा होईल, असे पाटील यांनी म्हटले आहे.

या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्या वरील आरोपांविषयी बोलतांना पाटील यांनी या प्रकरणात काही अर्थ नसल्याचे निष्पन्न झाले आहे, असे सांगितले.