जितेंद्र आव्हाड यांना बिश्नोई टोळीच्या नावाने खंडणीसाठी धमकी

या गुन्ह्याचे अन्वेषण ठाणे सायबर सेलकडे सोपवण्यात आले आहे. याविषयी राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी हेमंत वाणी यांनी तक्रार केली आहे.

नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संजय पानसरे यांना अटक

संजय पानसरे यांनी मे. निर्मला औद्योगिक संस्थेचे मासिक भाडे ६१ सहस्र रुपये इतके असतांना ते ८ सहस्र रुपये इतके अल्प करण्याच्या प्रस्तावाला अनुमोदन दिल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

बारामती (पुणे) लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराला दिले ‘तुतारी’चे चिन्ह !

सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे ‘तुतारी फुंकणारा माणूस’ असे चिन्ह आहे, तर अपक्ष उमेदवाराला ‘तुतारी’ चिन्ह दिले आहे. त्यामुळे मतदारांचा गोंधळ होऊ शकतो, असे सुळे म्हणाल्या.

BharatRatna To Yashvantrao Chavan : सत्तेत आल्यास यशवंतराव चव्हाण यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याचा प्रयत्न करू ! – राष्ट्रवादी काँग्रेस

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून २२ एप्रिल या दिवशी निवडणूक घोषणापत्र घोषित करण्यात आले !

नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी नाव मागे घेतले !

उमेदवारांच्या स्पर्धेतून नाव मागे घेतांना उमेदवारीला विलंब होत असल्यामुळे त्याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो. त्यामुळे धोका टाळण्यासाठी स्वत:चे नाव मागे घेत असल्याचे भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

एकनाथ खडसे यांना अमेरिकेतून धमकीचे दूरभाष !

सध्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेले आणि भाजपमध्ये प्रवेश करणार असलेले एकनाथ खडसे यांना ४ वेगवेगळ्या भ्रमणभाष क्रमांकांवरून दाऊद आणि छोटा शकील टोळींकडून धमकीचे दूरभाष आले आहेत.

भाजपकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी घोषित !

सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांची लढत महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यासमवेत होणार आहे. शिंदे हे शरदचंद्र पवार गटाच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.

एकनाथ खडसे १५ दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करणार !

‘येत्या १५ दिवसांत वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत माझा प्रवेश सोहळा देहली येथे होणार आहे’, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळे महायुतीची अनुकूलता विजयात परावर्तित होईल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जेव्हापासून हिंदुत्वाचे सूत्र मनसेने हाती घेतले, तेव्हापासून त्यांची आणि आमची जवळीक वाढली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्ष २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांना जाहीरपणे पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती.

जिवंत खेकडा दोरीने बांधून दाखवल्याप्रकरणी आमदार रोहित पवार यांच्यावर कारवाई करा !

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये प्रतिकात्मक म्हणून ‘जिवंत खेकडा’ दोरीने बांधून दाखवला होता. खेकड्याचा चुकीचा वापर केल्याविषयी ‘पेटा इंडिया’ या संस्थेने आक्षेप घेतला आहे.