राज्याचे मंत्री कायद्यापेक्षा मोठे नाहीत ! – अनिल देशमुख

मुंबई – भाजपकडून धनंजय मुंडे यांना लक्ष करत त्यांच्या त्यागपत्राची मागणी करण्यात येत आहे, तसेच सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी १४ जानेवारी या दिवशी धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. या सर्व प्रकरणावर गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, ‘‘राज्याचा मंत्री जरी असला, तरी तो कायद्यापेक्षा मोठा नाही. लवकरच या प्रकरणातील सत्य बाहेर येईल.’’