१ ऑक्टोबरपासून जन्म प्रमाणपत्राद्वारे मिळवता येणार सर्व कागदपत्रे !

१ ऑक्टोबर २०२३ पासून जन्म प्रमाणपत्राविषयी (‘बर्थ सर्टिफिकेट’विषयी) नवीन नियम लागू होणार आहे. या नवीन नियमानुसार, जन्म प्रमाणपत्राच्या आधारे शाळा प्रवेशापासून ते वाहनचालक परवाना, सरकारी नोकरी, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पारपत्र, विवाह नोंदणी इत्यादी कागदपत्रे मिळवणे शक्य होणार आहे.

काँग्रेसचे आमदार मामन खान यांना अटक !

हिंदूंवर आक्रमण करून दंगल घडवणार्‍या धर्मांधांच्या मागे काँग्रेसचा नेहमीच हात असतो, हा फाळणीपासूनचा इतिहास आहे. हेच आता मामन खान यांच्या अटकेतून पुन्हा दिसून आले.

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेची उसगाव, फोंडा (गोवा) येथे धाड

आतंकवादी कारवायांशी निगडित संशयितांना गोवा राज्य रहाण्यासाठी सुरक्षित का वाटते ? अमली पदार्थ व्यवहाराविषयीही तेलंगाणाचे पोलीस गोव्यात येऊन मोठी कारवाई करतात. या गोष्टी गोवा पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणार्‍या आहेत !

‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ या संघटनेला शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घाला ! – विश्व हिंदु परिषद, गोवा

कुराणावरील सिद्धांतानुसार चालणाऱ्या या संघटनेचा उद्देश; धार्मिक सलोखा राखणे हा नव्हे, तर अन्य धर्मीय युवावर्गाला इस्लामकडे आकर्षित करणे, हाच आहे !

भारतात अवैधरित्‍या प्रवेश केलेल्‍या ३ बांगलादेशी नागरिकांना नेरूळ येथे अटक

नेरूळ येथे एका झोपडीतून ३ बांगलादेशी नागरिकांना आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे. या तिघांनी अवैधपणे भारतात प्रवेश केला असून यातील दोघांनी १२ वर्षांपूर्वी आपल्‍या पालकांच्‍या समवेत, तर तिसर्‍या आरोपीने ६ वर्षांपूर्वी पतीसमवेत भारतात प्रवेश केला होता.

अमित शहा यांचा संभाजीनगरचा दौरा रहित !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १७ सप्‍टेंबर या दिवशी छत्रपती संभाजीनगरच्‍या दौर्‍यावर येणार होते; मात्र त्‍यांच्‍या वेळेचे नियोजन होत नसल्‍याने त्‍यांचा हा दौरा रहित करण्‍यात आला आहे, अशी माहिती येथील भाजपच्‍या नेत्‍यांकडून देण्‍यात आली आहे. 

नरेश गोयल यांच्‍या न्‍यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ !

कॅनरा बँकेची आर्थिक फसवणूक केल्‍याप्रकरणी अटकेत असलेले ‘जेट एअरवेज’चे संस्‍थापक नरेश गोयल यांना विशेष ‘पी.एल्.एम्.ए.’ न्‍यायालयाने १४ दिवसांची न्‍यायालयीन कोठडी दिली आहे.

पोलिसांकडून गुन्हेगारी प्रकरणांविषयी प्रसारमाध्यमांना दिल्या जाणार्‍या माहितीविषयी नियमावली सिद्ध करा !

न्यायालयाने म्हटले की, पक्षपाती वार्तांकनामुळे गुन्हा करणार्‍या व्यक्तीविषयी लोकांमध्ये संशयाचे वातावरण वाढीस लागते. माध्यमांतील बातम्यांमुळे पीडिताच्या खासगीपणाचाही भंग होतो.

पुणे येथे राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाच्‍या वतीने ‘अखिल भारतीय समन्‍वयक बैठकी’चे आयोजन

राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाची ‘अखिल भारतीय समन्‍वय बैठक २०२३’ पुणे येथे होत असून या बैठकीत ३६ संघटनांचे २६६ प्रमुख पदाधिकारी उपस्‍थित रहाणार आहेत. ही निवासी बैठक सर परशुराम महाविद्यालय (एस्.पी. कॉलेज) येथे पार पडेल.

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) येथे एकूण ५ अधिकारी आणि सैनिक वीरगतीला प्राप्त

काश्मीरमध्ये प्रतिवर्षी १०० हून अधिक आतंकवाद्यांना ठार केले जाते, तरीही तेथील आतंकवाद समूळ नष्ट झालेला नाही. त्यासाठी आतंकवाद्यांचा निर्माता असणार्‍या पाकला नष्ट करणे आवश्यक आहे !