काँग्रेसचे आमदार मामन खान यांना अटक !

नूंह (हरियाणा) येथील धर्मांध मुसलमानांनी हिंदूंच्या यात्रेवर केलेल्या आक्रमणाचे प्रकरण

आमदार मामन खान

चंडीगड – हरियाणातील नूंह येथे ३१ जुलै २०२३ या दिवशी बृजमंडल जलाभिषेक यात्रेवर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केले होते. यात ७ जणांचा मृत्यू झाला होता, तर १०० हून अधिक जण घायाळ झाल होते. या प्रकरणी पोलिसांनी काँग्रेसचे आमदार मामन खान यांना अटक केली आहे. मामन खान यांनी मुसलमानांना चिथावणी देतांनाचा एक व्हिडिओ प्रसारित केला होता. त्यामुळे यात्रेवर आक्रमण झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे, तसेच आक्रमणाच्या वेळी ते धर्मांध मुसलमानांच्या संपर्कातही होते, असाही आरोप आहे. उपपोलीस अधीक्षक सतीश कुमार यांनी सांगितले, ‘खान यांना राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येत आहे.’ दुसरीकडे पोलिसांनी मामन खान यांच्या गावाला घेराव घातला आहे. येथे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला आहे.

पोलिसांनी मामन खान यांना दोनदा नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावले; पण ते कारणे देत चौकशीसाठी उपस्थित झाले नव्हते. मामन खान यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून हिंसाचाराच्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली होती. (‘चोराच्या उलट्या बोंबा’ म्हणतात ते हेच ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

हिंदूंवर आक्रमण करून दंगल घडवणार्‍या धर्मांधांच्या मागे काँग्रेसचा नेहमीच हात असतो, हा फाळणीपासूनचा इतिहास आहे. हेच आता मामन खान यांच्या अटकेतून पुन्हा दिसून आले. याविषयी आता हिंदूंना ‘आतंकवादी’ म्हणणारे ढोंगी निधर्मीवादी, अहिंसावादी आणि गांधीवादी काँग्रेसी तोंड उघडणार नाहीत !