आतंकवादविरोधी पथकाची कारवाई !
नवी मुंबई – नेरूळ येथे एका झोपडीतून ३ बांगलादेशी नागरिकांना आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे. या तिघांनी अवैधपणे भारतात प्रवेश केला असून यातील दोघांनी १२ वर्षांपूर्वी आपल्या पालकांच्या समवेत, तर तिसर्या आरोपीने ६ वर्षांपूर्वी पतीसमवेत भारतात प्रवेश केला होता. अहदुल इंजील मुल्ला, रत्ना अहदुल इंजील मुल्ला आणि रिपा बिश्वास अशी आरोपींची नावे आहेत.
१. अहदुल आणि रत्ना हे दोघे १२ वर्षांपूर्वी आई-वडिलांच्या समवेत भारतात आले होते. त्यांच्या आई-वडिलांच्या विरोधात पारपत्र कायद्यांतर्गत वर्ष २०११ मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता.
२. रिपा ही ६ वर्षांपूर्वी तिच्या पतीसमवेत भारतात आली होती.
हे तिघेही नेरूळ येथील अपोलो रुग्णालयाजवळील झोपडपट्टीत रहात होते. या तिघांविषयी आतंकवादविरोधी पथकाला माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर त्यांनी तिघांना कह्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्यांच्याकडे भारतीय असल्याची कुठलीही कागदपत्रे नसल्याचे उघड झाले. यानंतर त्यांच्यावर पारपत्र कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाघुसखोरांनी पोखरलेला भारत ! |