सामानावरील शुल्क माफ न केल्यावरून केली टीका
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या दौर्यावर असणारा पसार गुन्हेगार झाकीर नाईक याने पाकिस्तानचे विमान वाहतूक आस्थापन ‘पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स’वर (‘पी.आय.ए.’वर) टीका करत भारताचे कौतुक केले आहे. तो म्हणाला की, मी पाकिस्तानात सरकारी पाहुणा म्हणून आलो असतांनाही ‘पी.आय.ए.’ने माझ्या सामानाचे पैसे वसूल केले. भारतात कोणत्याही विमान वाहतूक आस्थापनाने माझे नाव ऐकल्यानंतर माझ्या सामानाचे शुल्क माफ केले असते. मला खरे बोलतांना वाईट वाटते; पण पाकिस्तानची ही अवस्था आहे.
संपादकीय भूमिकास्वतःच्या स्वार्थासाठी पाकवरही टीका करणारा झाकीर कधीतरी भारताचा विश्वासू होऊ शकेल का ? |