मुंबई – अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात ५० टक्के वाढ करणार असून भाऊबीजेनिमित्त त्यांना २ सहस्र रुपये ओवाळणी देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. यासाठी ४० कोटी १२ लाख ५० सहस्र रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
आदिती तटकरे म्हणाल्या, ‘‘महाराष्ट्रातील अंगणवाडी ताई आपल्या बालकांचे, गरोदर मातांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी मोलाची भूमिका बजावतात. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांना आर्थिक दृष्ट्याही सक्षम करण्यासाठी राज्यशासनाच्या वतीने हा निर्णय घेतला आहे.’’