मालाड (मुंबई) येथील ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या सेटला लागलेल्या आगीत संपूर्ण सेट भस्मसात

येथील मालाड भागातील ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या चित्रीकरण स्थळी २ फेब्रुवारी या दिवशी दुपारी आग लागली. ओम राऊत यांच्या दिग्दर्शनात साकारल्या जाणार्‍या या चित्रपटाच्या ‘क्रोमा शूट’साठी मुंबईत सेट उभारण्यात आला होता. अभिनेता सूर्या एका दृश्याचे चित्रीकरण करत होता. तेवढ्यात सेटला आग लागली.

आयकरामध्ये कुठलीही नवीन सुट नाही !

लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी १ फेब्रुवारी या दिवशी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. प्रथमच ‘पेपरलेस’ अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यासाठी  सीतारामन् यांच्याकडून ‘मेक इन इंडिया’ ‘टॅब’चा वापर करण्यात आला.

(म्हणे) ‘आजचा हिंदु समाज हा पूर्णतः सडला असून भारतात मुसलमानांवर अन्याय होत आहे !’

एल्गार परिषदेत अलिगढ मुस्लिम विद्यापिठातील विद्यार्थी शरजील उस्मानी याची हिंदुद्वेषी गरळओक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात कोणीही येऊन हिंदूंची अपकीर्ती करून जातो आणि त्याच्यावर कारवाई होत नाही, हे संतापजनक नाही का ?

‘ओटीटी’ माध्यमावरील आशय नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमावली करणार ! –  प्रकाश जावडेकर

वास्तविक सरकारने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या आणि राष्ट्रविरोधी असणार्‍या वेब मालिकांवर स्वतःहून कारवाई करत त्यांच्यासाठी कडक नियमावली लागू करणे आवश्यक होते !

कोल्हापूर येथे ६ फेब्रुवारी या दिवशी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचा वर्धापनदिन सोहळा !

वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देतांना डॉ. विजय जंगम स्वामी म्हणाले, ‘‘वीरशैव समाजाच्या उत्कर्षासाठी स्वत:ला वाहून घेतलेल्या मान्यवरांचा विशेष सत्कार या सोहळ्यामध्ये करण्यात येणार आहे.

अखिल भारतीय ‘भाषा पर्व स्पर्धे’मध्ये सनातनची बालसाधिका कु. वेदिका मोदी हिच्या संस्कृत कथाकथनाला प्रथम क्रमांक

कु. वेदिका मोदी हिने संस्कृत विभागातील ‘संस्कृत कथाकथन’ या प्रकारामध्ये येथील ‘देहली पब्लिक स्कूल’चे प्रतिनिधीत्व केले.

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कार्यक्रमांचे नियमन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देणार ! – केंद्र सरकार  

‘ओटीटी’ अ‍ॅप्सवर आतापर्यंत अनेक वेब सिरींजमधून हिंदूंच्या देवता, राष्ट्रपुरुष, भारतीय वायूदल आदींचा अवमान केला गेला आहे.

‘सनातन प्रभात’च्या आवृत्त्यांचे पुन:श्‍च हरिओम !

कोरोनाचे संकट काहीसे अल्प झाल्याने १० मासांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा १ फेब्रुवारी २०२१ चा अंक वाचकांच्या हाती देतांना आम्हाला आनंद होत आहे. परात्पर गुरुदेवांच्या कृपाशीर्वादाने प्रारंभ झालेली ही घौडदौड वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेपर्यंत चालूच रहाणार आहे ! – संपादक

देहलीमधील हिंसाचारामध्ये राष्ट्रध्वजाचा अपमान ! – पंतप्रधान मोदी

ही घटना राष्ट्रध्वजाचा अपमान करणारी आहे. या घटनेने देश अतिशय दु:खी आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये केले; मात्र त्यांनी शेतकरी आंदोलनाचा कुठलाही उल्लेख केला नाही.

पुण्यातील एल्गार परिषदेत झळकले कोरेगाव भीमा दंगलीतील संशयित आरोपींचे ‘पोस्टर ’

संशयित आरोपींचे पोस्टर लागूनही पोलिसांनी परिषदेच्या आयोजकांवर कारवाई का केली नाही ?