
मुंबई – येथील मालाड भागातील ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या चित्रीकरण स्थळी २ फेब्रुवारी या दिवशी दुपारी आग लागली. ओम राऊत यांच्या दिग्दर्शनात साकारल्या जाणार्या या चित्रपटाच्या ‘क्रोमा शूट’साठी मुंबईत सेट उभारण्यात आला होता. अभिनेता सूर्या एका दृश्याचे चित्रीकरण करत होता. तेवढ्यात सेटला आग लागली. आगीची माहिती मिळताच तेथील ५० ते ६० कलाकार आणि कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठी हानी टळली.
#SaifAliKhan starrer ‘#Adipurush‘ set catches fire, no casualties reported so far.https://t.co/IwlufRGgDo
— Zee News English (@ZeeNewsEnglish) February 2, 2021
आग लागण्याचे कारण लक्षात आलेले नाही. आगीचे स्वरूप मोठे असल्याने तेथील भागात धुराचे लोट पसरले होते. अग्नीशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलेले असले, तरी चित्रपटाचा संपूर्ण सेट भस्मसात झाला आहे.
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk
(म्हणे) ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए !’ – अभिजित दीपके
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
Dharmendra Pradhan Resigned : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे अंतत: त्यागपत्र !