‘सनातन प्रभात’चे संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या संकल्पातून प्रारंभ झालेल्या, द्विदशकपूर्ती साजरी करणार्या दैनिक ‘सनातन प्रभात’ची घौडदौड कधीच थांबली नाही. कोणत्याही काळात एक दिवसही बंद न झालेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’ची पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई आवृत्ती कोरोनाच्या काळातील दळणवळण बंदीमुळे २२ मार्च २०२० पासून बंद करावी लागली. या कालावधीत वाचकांपर्यंत दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक पोचू न शकल्याने आम्ही दिलगीर आहोत.
दैनिक ‘सनातन प्रभात’ची मुद्रित आवृत्ती जरी बंद झाली, तरी ‘पी.डी.एफ्’च्या रूपाने मात्र दैनिक सनातन प्रभात सहस्रो वाचक, हितचिंतक, हिंदुत्वनिष्ठ, विज्ञापनदाते यांच्यापर्यंत पोचतच होता. मधल्या काळात अनेक वाचक, हितचिंतक, हिंदुत्वनिष्ठ हे दैनिक ‘सनातन प्रभात’ परत कधी चालू होणार, याची विचारणा करत होते. अशी विचारणा होणे, हीच सनातनच्या कार्याची पोचपावती होय.
कोरोनाचे संकट काहीसे अल्प झाल्याने १० मासांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा १ फेब्रुवारी २०२१ चा अंक वाचकांच्या हाती देतांना आम्हाला आनंद होत आहे. परात्पर गुरुदेवांच्या कृपाशीर्वादाने प्रारंभ झालेली ही घौडदौड वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेपर्यंत चालूच रहाणार आहे !
– संपादक