दक्षिण मुंबईतील हवा देहलीपेक्षा अधिक विषारी !

देहलीपेक्षा दक्षिण मुंबईतील हवा अधिक प्रदूषित झाल्याचे पडताळणीतून समोर आले आहे. मुंबईतील सध्याच्या वातावरणामुळे श्वसनाचे आजार असलेल्यांच्या श्वासाच्या समस्येत वाढ होते.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांसह दोघांना फरार घोषित !

३० दिवसांच्या आत न्यायालयापुढे उपस्थित न राहिलास त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्यशासनाला असणार आहे.

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या स्थळाविषयी शासनात मतभिन्नता !

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या वेळी ७ डिसेंबर हा विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा दिनांक घोषित करण्यात आला; मात्र अधिवेशन मुंबई कि नागपूर येथे घ्यावे ?, याचा निर्णय अजून झालेला नाही. त्यामुळे प्रशासनाची कुचंबणा झाली आहे.

जालना येथे वक्फ मंडळाच्या भूमीची परस्पर खरेदी-विक्री केल्याप्रकरणी ९ जणांवर गुन्हा नोंद !

अपहार रोखण्यासाठी सरकारने वक्फ मंडळाच्या सर्व व्यवहारांची चौकशी करावी, तसेच वक्फ मंडळाला देण्यात येणारे सर्व अनुदान त्वरित बंद करावे !

राज्यातील दंगलसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचे संचलन !

त्रिपुरा येथे मशीद पाडल्याच्या कथित घटनेनंतर महाराष्ट्रात १२ नोव्हेंबर या दिवशी निर्माण झालेल्या दंगलसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर १४ नोव्हेंबर या दिवशी मुंबईतील जे.जे. मार्ग आणि विक्रोळी येथे पोलिसांनी संचलन केले.

धार्मिक दंगली घडवणार्‍या रझा अकादमीवर कायमची बंदी घालण्यासाठी केंद्राकडे शिफारस करा !

धार्मिक दंगली घडवणार्‍या रझा अकादमीवर कायमची बंदी घालण्याची शिफारस राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारकडे करावी, अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

निनावी दूरभाषद्वारे मुंबईत लोकलमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी  

या धमकीनंतर लोकल रेल्वेस्थानकांसह मुंबईतील सर्वत्र सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. बॉम्बशोध पथक आणि श्‍वानपथक यांच्याद्वारे रेल्वेस्थानकांवर संशयास्पद वस्तूंचा शोध घेण्यात येत आहे.

राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवून अराजकाची स्थिती निर्माण करणार्‍या धर्मांधांवर कारवाई करा आणि त्यांना चिथावणी देणार्‍या रझा अकादमीवर बंदी घाला !

त्रिपुरा राज्यातील कथित घटनांच्या निषेधार्थ धर्मांधांनी महाराष्ट्रात निषेध करण्यासाठी बंद पाळणे आणि मोर्चा काढणे, याचे कारण काय ?

आझाद मैदान दंगलीतील आरोपींकडून ९ वर्षांनंतरही हानीभरपाई वसूली नाही ! – दंडाधिकारी कार्यालयातील अधिकार्‍यांची माहिती

सध्या हे सर्व ६० आरोपी जामिनावर आहेत. पोलीस आणि प्रशासन यांची हतबलता, शासनकर्त्यांची उदासीनता यांमुळे हे सर्व गुन्हेगार अद्यापही मोकाट आहेत !

देहली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर !

भारताची राजधानीच प्रदूषित असेल, तर अन्य शहरांची स्थिती काय असेल, याची कल्पना येते ! या स्थितीला आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !