मुंबई – त्रिपुरा येथे मशीद पाडल्याच्या कथित घटनेनंतर महाराष्ट्रात १२ नोव्हेंबर या दिवशी निर्माण झालेल्या दंगलसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर १४ नोव्हेंबर या दिवशी मुंबईतील जे.जे. मार्ग आणि विक्रोळी येथे पोलिसांनी संचलन केले. काही ठिकाणी पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधून अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्रातील सौहार्दाचे वातावरण कायम ठेवावे ! – संजय पांडे, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र
महाराष्ट्रातील जनता आम्हाला पोलीस बळाचा वापर करण्यास प्रवृत्त करणार नाही, याची आम्हाला निश्चिती आहे. आपल्या राज्याशी संबंध नसतांना जे काही झाले असेल, त्याला बाजूला ठेवूया. महाराष्ट्रातील सौहार्दाचे वातावरण कायम ठेवावे.