निनावी दूरभाषद्वारे मुंबईत लोकलमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी  

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई – वांद्रे येथील रेल्वे पोलीस कार्यालयात १३ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ६.२५ वाजता निनावी दूरभाषद्वारे लोकलमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली. धमकीचा दूरभाष कुणी केला, याचा शोध पोलीस घेत आहेत. या धमकीनंतर लोकल रेल्वेस्थानकांसह मुंबईतील सर्वत्र सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. बॉम्बशोध पथक आणि श्‍वानपथक यांच्याद्वारे रेल्वेस्थानकांवर संशयास्पद वस्तूंचा शोध घेण्यात येत आहे.