देहली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर !

भारताची राजधानीच प्रदूषित असेल, तर अन्य शहरांची स्थिती काय असेल, याची कल्पना येते ! या स्थितीला आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत ! – संपादक

नवी देहली – स्वित्झर्लंडच्या ‘एक्यूआय एअर’ या हवामान समूहाने नवी देहली शहराला जगातील ‘सर्वांत प्रदूषित शहर’ म्हटले आहे. देहलीतील हवेची गुणवत्ता पातळी (एक्यूआय) १३ नोव्हेंबरला ५५६ इतकी नोंदवली गेली, जी गंभीर श्रेणीत मोडते. जगातील १० प्रदूषित शहरांमध्ये देहली आघाडीवर आहे. मुंबई आणि कोलकाता या शहरांचाही यामध्ये समावेश आहे. या सूचीमध्ये पाकिस्तानचे लाहोर आणि चीनचे चेंदगू शहर देखील समाविष्ट आहेत.

उत्तरप्रदेशातील ५ शहरांच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ४०० पेक्षा अधिक !

उत्तरप्रदेशातील बुलंदशहर, हापूड, नोएडा, मेरठ आणि गाझियाबाद या ५ शहरांत हवेची गुणवत्ता खालावली आहे. १३ नोव्हेंबरला या शहरांमधील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ४०० पेक्षा अधिक नोंदवला गेला.