माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्पादन शुल्क खात्यातही स्थानांतराचा भ्रष्टाचार केला !

स्वार्थासाठी अधिकाऱ्यांची स्थानांतरे करणारे जनतेचाही घात करणार हे निश्चित ! – संपादक

अनिल देशमुख

मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री असतांना राज्यातील ९० उत्पादन शुल्क निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्या स्थानांतरासाठी (बदली) सूची दिली होती, असा गौप्यस्फोट उत्पादन शुल्क विभागाचे माजी आयुक्त आनंद कुलकर्णी यांनी केला आहे. याविषयी त्यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ वृत्तपत्रात माहिती दिली आहे.

आनंद कुलकर्णी यांनी यासंबंधी माहिती देतांना सांगितले की, वर्ष २०००-२००१ या काळात देशमुख उत्पादन शुल्क मंत्री होते. त्या वेळी त्यांनी राज्यातील ९० उत्पादन शुल्क निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्या स्थानांतराची सूची आपल्याला पाठवली होती. यातील अनेकांचे स्थानांतर नियमबाह्य पद्धतीने करावे लागणार होते. त्याला विरोध केल्यामुळे माझे स्थानांतर वाहतूक विभागात करण्यात आले. अनिल देशमुख यांनी पोलिसांच्या स्थानांतरामध्येही भ्रष्टाचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.