मुंबईत सदनिकांची अनधिकृत विक्री दंड आकारून नियमित करण्यात येणार !

कब्जे हक्काने दिलेल्या भूमीवरील सदनिकांचे मूळ आणि नंतरच्या मालकांनी केलेले सर्व विक्री व्यवहार १ ते ५ टक्के दंड अन् हस्तांतर शुल्क आकारून नियमित करण्यात येणार आहेत, असा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.

मलिक यांच्या अटकेनंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक !

या बैठकीनंतर शरद पवार यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या निवासस्थानी बैठकीसाठी गेले. या ठिकाणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांचे मंत्री बैठकीला उपस्थित होते. सायंकाळी ७.३० वाजता या बैठकीला प्रारंभ झाला.

नवी मुंबईत ३५ लाख रुपयांचा अमली पदार्थांचा साठा कह्यात !

ठाणे-बेलापूर मार्गावर एका नायजेरियन नागरिकाला अटक करून त्याच्याकडून २२ लाख रुपयांचे ‘एम्फेटामाईन’ आणि ‘मेथाक्युलॉन’ हे अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले.

सार्वजनिकरित्या आरोप करत असल्यामुळे नवाब मलिक यांच्यावर कारवाई ! – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘ट्विटर’ खात्यावरून  शरद पवार यांच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे.

द्रोणागिरीसह उलवे क्षेत्रांत दोन दिवस पाणीपुरवठा बंद !

हेटवणे पाणीपुरवठा योजनेसाठी जिते येथील उपकेंद्रावरून वीज पुरवली जाते. या उपकेंद्राची दुरुस्ती करण्यासाठी वीजपुरवठा बंद करण्यात येणार आहे.

खारघर येथील इस्कॉन मंदिरात चोरी करणार्‍या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक !

३१ जानेवारीच्या रात्री इस्कॉन मंदिरातील दानपेटी फोडून ८० सहस्र रुपयांची चोरी करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी ओवागाव कॅम्प परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

‘सामान्यांना अनुक्रमाने, तर प्रभावी व्यक्तीला तातडीने सुनावणी’, अशासाठी न्यायव्यवस्था आहे का ?

मुंबई उच्च न्यायालयाने न्यायालयीन कर्मचारी आणि अधिवक्ता यांना फटकारले. न्यायालयाने नोंदवलेली टिपणी न्यायालयीन कामकाजाविषयी गंभीर असून याविषयी चौकशी होणे आवश्यक आहे !

मराठी भाषा गौरवदिनी ‘मराठी’ला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा !

केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांची भेट घेऊन मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी केली मागणी ! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यास विलंब होणे प्रशासनाला लज्जास्पद !

लोकलगाड्यांमध्ये लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच प्रवेश देण्याचा निर्णय मागे घ्या ! – मुंबई उच्च न्यायालय

कोरोनाच्या काळात एवढे छान काम केल्यानंतर आता परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असतांना राज्याचे नाव अपकीर्त का करताय ? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने या वेळी उपस्थित केला.