Dinesh Gundu Rao Notice : कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांना नोटीस !

  • स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्याचे प्रकरण

  • सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दिली नोटीस !

दिनेश गुंडू राव यांना नोटीस

पुणे – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या प्रकरणी कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांना सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी नोटीस बजावली आहे. ‘गुंडू त्यांनी १५ दिवसांमध्ये जाहीर क्षमा न मागितल्यास त्यांच्या विरोधात न्यायालयीन कारवाई केली जाईल’, असे सात्यकी सावरकर यांनी स्पष्ट केले आहे.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर गोहत्येच्या विरोधात नव्हते. ते गोमांस खायचे. त्यांचे विचार मूलतत्त्ववादी होते’, असे अवमानकारक वक्तव्य कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी केले होते. तसेच सावरकर यांची तुलना महात्मा गांधी आणि महंमद अली जिना यांच्याशी केली. त्यांच्या या दायित्वशून्य आणि निराधार वक्तव्यामुळे सावरकर यांची प्रतिमा मलिन झाली आहे. त्याविरोधात सावरकरप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. गुंडू राव यांनी केलेले विधान त्यांचे व्यक्तीगत आहे का ? तसेच संबंधित वक्तव्य आणि विचार ही काँग्रेसची भूमिका आहे का ? यांचाही खुलासा करावा, असेही सावरकर यांनी गुंडू राव यांना दिलेल्या नोटीसीत म्हटले आहे.