मुंबईतील ३ पोलीस अधिकार्‍यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा नोंद !

  • भ्रष्टाचारी पोलीस ! – संपादक

  • खंडणीखोर पोलीस कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ? – संपादक

मुंबई – व्यापार्‍यांकडून खंडणी उकळत असल्याच्या आरोपाखाली मुंबईतील ३ पोलीस अधिकार्‍यांच्या विरोधात लोकमान्य टिळक (एल्.टी.) मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ओम वनघाटे, साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कदम आणि पोलीस उपनिरीक्षक समाधान जामठाडे अशी या पोलिसांची नावे आहेत.

जानेवारीमध्ये काही व्यापार्‍यांनी या पोलिसांच्या विरोधात पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार केली होती. यावर नगराळे यांनी विभागीय पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांना चौकशीचा आदेश दिला होता. या चौकशीत तीनही पोलीस अधिकारी दोषी असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.