मुंबई, २० फेब्रुवारी (वार्ता.) – शिवजयंतीनिमित्त भांडुप येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. रितेश चव्हाण यांच्या घरी शिवजयंती उत्साहात साजरी झाली. चार वर्षांपासून ते त्यांच्या घरी शिवजयंती साजरी करत आहेत. ते स्थानिक नागरिकांना निमंत्रण देतात. घरी शिवजयंती करण्यामागे त्यांच्या मातोश्री सौ. ज्योती चव्हाण यांची प्रेरणा आहे, असे त्यांनी सांगितले. या वेळी सौ. चव्हाण म्हणाल्या ‘‘आपण घरी गणेशोत्सव साजरा करतो, सत्यनारायणाची पूजा करतो. त्याप्रमाणेच ज्यांनी हिंदु धर्माला आणि समस्त हिंदूंना वाचवणार्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती प्रत्येक घरात साजरी झाली पाहिजे. त्याचसमवेत आजच्या तरुणांना अध्यात्माविषयीही सांगितले पाहिजे. मी माझ्या मुलाला यासाठी प्रोत्साहित करते.’’ या वेळी स्थानिक हिंदुत्वनिष्ठ श्री. अतुल फोपले, श्री. गणेश पाटील आणि श्री. सचिन घाग उपस्थित होते.