तेल अविव (इस्रायल) – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या खासगी निवासस्थानावर लेबनॉनमधून ड्रोनद्वारे आक्रमण करण्यात आले. हे आक्रमण हिजबुल्ला या जिहादी आतंकवादी संघटनेकडून करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या आक्रमणात कोणतीही हानी झाली नाही. आक्रमणाच्या वेळी बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांच्या पत्नी, हे दोघेही घरी नव्हते. इस्रायली सैन्याने सांगितले की, लेबनॉनमधून ३ ड्रोन डागण्यात आले, त्यांपैकी २ हवाई संरक्षण यंत्रणेने हवेतच नष्ट केले, तर एका ड्रोनने एका निवासी इमारतीला धडक दिली.