(स्टेटस म्हणजे इतरांना पहाता येण्यासाठी सामाजिक माध्यमांवरील स्वतःच्या खात्यावर प्रसारित केलेले चित्र किंवा लिखाण.)
पुणे – जिल्ह्यातील साखर (तालुका राजगड) येथील एका अल्पवयीन मुलाने औरंगजेबाच्या समर्थनार्थ भ्रमणभाषवर ‘स्टेटस’ ठेवल्याने या प्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी जमलेल्या परिसरातील संतप्त जमावाने प्रार्थनास्थळाची तोडफोड केली. (छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात आणि ‘छावा’ चित्रपट देशभर गाजत असतांना औरंगजेबाचे स्टेटस ठेवण्याचे या समाजकंटकांचे धारिष्ट्य होते, यातून त्यांच्यात हिंदुद्वेष किती मुरला आहे, हे लक्षात येते. अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक ! – संपादक) या घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख घटनास्थळी आले. त्यांनी परिसराची पहाणी करत दोषींवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. पोलिसांनी जमावाला समजावल्यानंतर तणाव पूर्ण निवळला असून गावात शांतता आहे.
पोलिसांनी सांगितले की, संबंधित मुलगा साखर गावातील आहे; मात्र तो २ वर्षांपासून पुण्यात रहात आहे. तो अल्पवयीन असून त्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार तो मानसिक आजारी आहे. (मानसिक आजारी असणार्यांना नेहमी हिंदूंच्या धर्मभावना दुखवण्याचे कसे काय सुचते ? – संपादक)