मुंबई – लहान मुलांवर भ्रमणभाषाच्या अतीवापराचा वाईट परिणाम होत असल्याची चर्चा सातत्याने ऐकायला मिळते. त्यासंदर्भात वैद्यकीय क्षेत्र किंवा मानसोपचार तज्ञ यांच्याकडून वारंवार जागृती केली जात आहे. लहान मुलांवरील भ्रमणभाष वापराच्या संभाव्य दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी दाऊदी बोहरा मुसलमान समाजाने १५ वर्षांखालील मुलांच्या भ्रमणभाष वापरावर निर्बंध घातले आहेत. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी कार्यशाळा आणि परिषदा घेतल्या जात आहेत, असे नुकतेच प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तात म्हटले आहे.
मुलांना वाचन, मैदानी खेळ आणि कुटुंब यांमध्ये अधिकाधिक वेळ घालवण्यासाठी संधी मिळावी अन् त्यातून त्यांचा मानसिक विकास व्हावा, हा यामागचा उद्देश असल्याचे या समाजाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भ्रमणभाषांचा वापर अल्प करण्यासंदर्भातील निर्बंध १५ वर्षांखालील मुलांसाठीच लागू असतील; कारण या वयात मुलांना योग्य काय किंवा अयोग्य काय, याचे आकलन नसते, असे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकालहान मुलांकडून भ्रमणभाषांच्या अतीवापरावर निर्बंध घालण्यासाठी सरकारनेच पावले उचलली पाहिजेत, असे जागरूक नागरिकांना वाटते ! |