नागपूरच्‍या पूरस्‍थितीला उत्तरदायी कोण ?

‘निसर्गाचा कोप म्‍हणायचा ? कि नियोजनशून्‍यतेचा शाप ?’ नदीपट्ट्यांतील बांधकामांना बंदी, नैसर्गिक नाले चालू करणे आणि अनधिकृत बांधकामे अन् अतिक्रमणे कायमची हटवल्‍यानंतरच पावसाळ्‍यातील नैसर्गिक आपत्तीतून नागरिकांची सुटका होणार आहे, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.

कोल्हापूर : जिल्हाधिकार्‍यांनी शेतकरी संघाची इमारत बळजोरीने कह्यात घेतली !

‘‘संघाची जागा बळजोरीने कह्यात घेऊन कोल्हापूरचे नाक कापण्याचे काम केले जात आहे. ‘बैल’ बसला आहे; म्हणून त्याला कुणी चुकीच्या पद्धतीने डिवचण्याचे काम करू नये. जिल्ह्यात संघाचे ४० सहस्र सभासद आहेत आणि २ लाख मतदार आहेत. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत धडा शिकवल्याविना रहाणार नाहीत.’’

पुणे येथे यावर्षीच्‍या श्री गणेशाच्‍या मूर्तींचा पुनर्वापर करून त्‍यापासून साकारणार पुढच्‍या वर्षीचे गणराय !

मुळात वहात्‍या पाण्‍यात विसर्जन करणे, हा श्री गणेशपूजनातील शेवटचा विधी आहे. असे असतांना प्राणप्रतिष्‍ठा केलेल्‍या मूर्ती विसर्जन न करता त्‍यांचा पुनर्वापर करणे हे अक्षम्‍य आहे आणि पुनर्वापरासाठी घेतलेल्‍या श्री गणेशमूर्तींची विक्री करण्‍याची अनुमती देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी असेच भाविकांना वाटते !

कोल्‍हापूर महापालिकेला भाविकांनी दान दिलेल्‍या श्री गणेशमूर्ती ओढ्यात टाकण्‍याचा प्रयत्न झाल्‍याने तणाव !

भाविकांनी श्रद्धेने दान दिलेल्‍या श्री गणेशमूर्तींची पुढे कशा प्रकारे विल्‍हेवाट लावली जाते ? याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्‍यामुळे भाविकांनी श्री गणेशमूर्ती दान न देता शास्‍त्रानुसार नदीत विसर्जितच कराव्‍यात. त्‍यामुळे श्री गणेशमूर्तीची होणारी विटंबना तरी टळेल !

यांत्रिक नौकांची मासेमारीसाठी मालवण (सिंधुदुर्ग) किनारपट्टी नजिकच्या समुद्रात घुसखोरी

यांत्रिक नौका, परप्रांतीय नौकाधारक आणि पारंपरिक मासेमार यांच्यात प्रतिवर्षी मासेमारीवरून वाद होत असतात. प्रतिवर्षीचा हा अनुभव असतांना मत्स्य विभागाचे प्रशासन त्यावर ठोस उपाययोजना का काढत नाही ?

प्रदूषणाच्या नावाखाली श्री गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन करणार्‍यांचे कुंभारांशी साटेलोटे ?

नदीच्या किनारी दान घेतलेल्या या श्री गणेशमूर्ती या ‘आयशर टेंपो’मधून कोल्हापूर, सांगली येथील कुंभारांना अगोदरच विकल्याची चर्चा जनमानसात आहे.

दान घेतलेल्या श्री गणेशमूर्ती बाजारात पुन्हा विक्रीस ठेवल्या जात असल्याने मूर्तीदान घेणार्‍या संस्थांवर महापालिकेने लक्ष ठेवावे ! – संतोष सौंदणकर, शिवसेना शहर संघटक

शास्त्रानुसार नैसर्गिक जलस्रोतात किंवा वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केल्यामुळे श्री गणेशमूर्तीतील गणेशतत्त्वे पाण्याद्वारे सर्वदूर पसरून चराचर सृष्टीला त्याचा लाभ होतो.

भिवंडी येथे बांगलादेशींना खोटे रेशनकार्ड बनवून देणारी टोळी अटकेत !

बनावट कागदपत्रांचा वापर करून बांगलादेशातील घुसखोर नागरिकांसाठी शिधापत्रिका बनवल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे. 

‘शाडू मातीची श्री गणेशमूर्ती आणूया’, असे आवाहन करणार्‍या कोल्हापूर महापालिकेची श्री गणेशमूर्ती ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ची !

कोल्हापूर महापालिकेच्या ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण’ अशा वृत्तीमुळे जनता महापालिकेवर विश्‍वास ठेवणार का ?

कानपूर (उत्तरप्रदेश) येथील सरकारी कार्यालयातील धारिका (फाईल्स) स्वच्छता कर्मचार्‍यांनी रद्दीत विकल्या !

स्वच्छता कर्मचारी अशा प्रकारचे कृत्य करत असतांना वरिष्ठ अधिकारी आणि सुरक्षारक्षक झोपले होते का ?