चोरट्या मार्गाने दारूच्या वापरात वाढ
कल्याण – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली परिसरात चोरट्या मार्गाने दारूचा वापर वाढला आहे. पोलिसांनी दोन ठिकाणी धाडी घालून ३०० लिटरहून अधिक साठ्याची हातभट्टीची नवसागरयुक्त आणि विदेशी मद्य जप्त केले आहे. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांचे पदाधिकारी झोपडपट्टी किंवा चाळींमध्ये रात्रीच्या वेळेत मद्य वाटून मतदारांना आकर्षित करतात. गेली अनेक वर्षे हा प्रकार चालू आहे. मद्य जप्त केल्याप्रकरणी माणेरे (उल्हासनगरजवळ) गावातील मद्य विक्रेता शैलेश भोईर आणि वाहतूकदार संजय जाधव यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका :निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोरट्या मार्गाने मद्याची विक्री वाढणे हा पोलीस आणि प्रशासन यांचा धाक नसल्याचा परिणाम ! |