चैत्र एकादशीला पंढरपूर येथील दर्शनवारीत स्थानिक सुरक्षारक्षक वारीत मध्येच लोकांना सोडत असल्याचा आरोप !

केवळ मुखदर्शन आणि उन्हामुळे त्रस्त असलेल्या वारकर्‍यांना मंदिर समितीच्या गैरव्यवस्थापनाचा फटका बसत होता. त्यामुळे श्री विठ्ठलाच्या दर्शनाला वेळ लागत होता, काही सुरक्षारक्षक वारीत मध्येच लोकांना सोडत असल्याचा आरोप होत आहे.

पैठण (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथे २१० गुरांची कातडी, तर वैजापूर येथे गोवंशियांचे २ टन मांस पोलिसांनी पकडले !

गोवंशियांची हत्या करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई केल्यानंतरच असे प्रकार थांबतील. पोलीस केवळ जुजबी कारवाई करत असल्याने धर्मांध पुन्हा गोवंशियांची कत्तल करतात, हे पोलिसांच्या कसे लक्षात येत नाही ?

अहिल्यानगरमधील सर्व पशूवधगृहे भुईसपाट करण्याची विविध हिंदु संघटनांची मागणी !

अशी मागणी का करावी लागते ? गोतस्‍करीची भीषण समस्‍या मुळापासून संपवण्‍यासाठी पोलिसांनी स्वतःहून गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही करून पशूवधगृहे बंद करावीत !

एवढे अनधिकृत बांधकाम होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ?

‘गिरकारवाडा, हरमल (गोवा) येथील २१६ पैकी ८८ जणांना अनधिकृत बांधकाम पाडण्याविषयी, तर ५३ व्यावसायिकांना व्यवसाय बंद करण्याविषयी नोटीस बजावल्याची माहिती गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाला दिली आहे.

पुणे येथे होर्डिंग कोसळल्याच्या प्रकरणी होर्डिंग मालकाला नोटीस !

होर्डिंग कोसळल्याचा प्रकार गंभीर आहे. वाघोलीत अनेक होर्डिंग आहेत. त्यांचे त्वरित ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Goa Stray Dogs Issue : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला आळा घालून त्याची माहिती द्या ! – आरोग्य केंद्र मडगाव (गोवा)

अशी तक्रार का करावी लागते ? नागरिकांना दिसते ते प्रशासनाला दिसत नाही का ?

रामटेकडी (पुणे) येथील प्रकल्पाला कचरा डेपोचे स्वरूप !

याविषयी प्रशासनाने जनतेला उत्तर देणे अपेक्षित आहे !

क्रांतीकारक दामोदर चापेकर यांच्या पश्चात्त त्यांच्या पत्नीला ना मिळाले निवृत्तीवेतन ना ताम्रपट !

स्वातंत्र्याच्या आधी आणि नंतरही काँग्रेसने कायमच क्रांतीकारकांचा द्वेष केला, हीच खरी शोकांतिका !

बारामती (पुणे) येथे शासकीय विभागाच्या त्रासाला कंटाळून वृद्ध शेतकर्‍याची आत्महत्या !

शासकीय विभागाच्या कामकाजातील अनास्थेचे उदाहरण !

संपादकीय : सरकारी आस्थापनांचा पांढरा हत्ती !

आस्थापने आणि महामंडळे लाभात चालवू न शकणारे सरकार मंदिरे का कह्यात घेते ?