भारतीय दंड विधान आणि ‘श्री ४२०’ !

राष्ट्रीयत्वाला धरून कायदे आणि यंत्रणा या गोष्टींमध्ये पालट करणे आवश्यक आहेच; परंतु ‘जुता जापानी, पतलून इंग्लिशस्तानी’, हे गाण्यात ठीक आहे; परंतु न्यायव्यवस्थेमध्ये पोषाख आणि हृदय हे दोन्ही भारतीय संस्कृतीनुरूप असेल, तरच तिची स्थिती सुधारेल !

श्री तुळजाभवानीदेवीचे मौल्यवान अलंकार हरवल्याच्या प्रकरणाचा अहवाल सादर होण्यापूर्वीच फुटला !

अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यापूर्वीच कसा फुटला ? एक अहवालही सांभाळू न शकणारे मंदिराचे प्रशासन देवीचे अलंकार कधीतरी सांभाळू शकेल का ?

कोल्हापुरात गणेशभक्तांकडून बॅरिकेट्स (तात्पुरते अडथळे) तोडून पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !

‘हिंदूंचे सण आल्यावरच प्रशासनाला प्रदूषण कसे काय आठवते ? न्यायालयाचा मशिदीवरील भोंगे काढण्याचाही आदेश आहे, मग त्याचे पालन प्रशासन कधी करणार ? – श्री .उदय भोसले

गोव्यात ६०० बसगाड्यांचा तुटवडा असल्याने सार्वजनिक वाहतुकीवर ताण

राज्यातील अनेक भागांत अजूनही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पोचलेली नाही. स्थानिक आमदार वारंवार गावामध्ये बसगाड्या चालू करण्याची मागणी करत आहेत; मात्र बसगाड्यांच्या कमतरतेमुळे ही मागणी पूर्ण झालेली नाही.

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत भारताने मांडली पाकिस्तानी हिंदु शरणार्थींची व्यथा

अत्याचारांना कंटाळून त्यांना त्यांची जन्मभूमी, नातेवाईक आणि मित्र परिवार सर्व सोडून भारतात यावे लागले. लोक केवळ भयापोटी स्वत:ची मातृभूमी त्यागतात.

विसर्जनासाठी वरिष्‍ठ पातळीवरून येणार्‍या आदेशांचे पालन करावे लागते ! – पोलीस अधीक्षक

बळजोरी पुढील दिवसांमध्‍ये घरगुती श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी भाविकांवर करू नये, या मागणीसाठी हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांच्‍या प्रतिनिधींनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेतली.

कृत्रिम हौदात गढूळ पाणी आणि कचरा असल्‍याने श्री गणेशमूर्ती घेऊन घरी परतण्‍याची भाविकांवर वेळ !

महापालिका प्रशासन आणखी किती वेळा अशा पद्धतीने गणेशाचा अवमान करणार आहे ? याविषयी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्‍यावर कठोर कारवाई करायला हवी. नदीला मुबलक पाणी असल्‍याने वहात्‍या पाण्‍यात गणेशमूर्तींचे विसर्जन केले, तर शास्‍त्राला धरून कृती होईल.

मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौद बांधून तेथेच विसर्जन करण्‍याचा अट्टहास !

धर्मशास्‍त्राप्रमाणे वहात्‍या पाण्‍यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करणे हे योग्‍य असतांना कृत्रिम हौद आणि मूर्तीदान मोहीम राबवून महापालिका अन् काही स्‍वयंसेवी संघटना धर्मद्रोही कृत्‍य करत आहेत. याला भक्‍तांनी संघटित होऊन वैध मार्गाने विरोध करावा.

कोल्‍हापुरात पंचगंगा घाटावर ‘बॅरिकेट्‌स’ लावून भाविकांना कृत्रिम कुंडात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्‍याची प्रशासनाची बळजोरी !

गेल्‍या ३ वर्षांप्रमाणेच यंदाही कोल्‍हापूर महापालिका प्रशासनाने ‘बॅरिकेट्‌स’लावून पंचगंगा नदीचा घाट बंद करून भाविकांना कृत्रिम कुंडात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्‍यास भाग पाडले.

सांगली प्रशासनाच्‍या नियोजनशून्‍यतेमुळे गणेशभक्‍तांसमोर विसर्जनाच्‍या वेळी ‘विघ्‍न’ !

सांगली जिल्‍ह्यात पावसाने मारलेली दडी आणि पाटबंधारे विभागाने केलेले अक्षम्‍य दुर्लक्ष यांमुळे सांगलीत कृष्‍णा नदीत २० सप्‍टेंबरला केवळ १ फूट पाणी होते.