राज्याच्या शिक्षण विभागाच्या खात्यातून ४७ लाख ६० सहस्र रुपयांची चोरी !

मुंबई – राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून बनावट शिक्का,धनादेश आणि स्वाक्षरी यांद्वारे तब्बल ४७ लाख ६० सहस्र रुपयांची चोरी झाली आहे. या प्रकरणी ४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. मंत्रालयातील अधिकोषातून हे पैसे काढण्यात आले आहेत.

नमिता बग, प्रमोद सिंग, तप कुमार आणि झितन खातून या नावांनी पैसे काढण्यात आले आहेत. मागील महिन्यात सरकारच्या पर्यटन विभागाच्या खात्यातून ६७ लाख रुपयांची चोरी झाली होती. ही चोरीही मंत्रालयातील अधिकोषातून झाली होती. हे चोर अद्याप सापडले नाहीत.