दावणगेरे (कर्नाटक) येथील घटना
दावणगेरे (कर्नाटक) – जिल्ह्यातील चन्नागिरी तालुक्यात असलेल्या नल्लूर कॅम्पमध्ये रामनवमीच्या उत्सवाच्या वेळी काही धर्मांध मुसलमान तरुणांनी हिंदु तरुणांवर चाकूद्वारे आक्रमण केले. यामध्ये हनुमंत आणि गोपाल हे हिंदु तरुण गंभीररित्या घायाळ झाले. त्यांच्यावर शिवमोग्गा येथील मेग्गाना रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वर्ष २०२२ मध्येही रामनवमीच्या दिवशी अशा प्रकारे हिंदूंवर आक्रमण करण्यात आले होते.
घायाळ झालेल्या गोपाळने स्थानिक वृत्तवाहिनीला सांगितले की, आम्ही रामनवमीच्या दिवशी लोकांना सरबत आणि कोशिंबीर यांचे वाटप करत होतो. तेव्हा गावातील काही अन्य पंथीय तरुणांनी आम्हाला शिवीगाळ केली. अचानक तरुणांनी माझ्यावर आक्रमण करून माझ्या पोटात चाकूने वार केले.
संपादकीय भूमिका
|