सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयाची निविदा प्रक्रिया लांबणीवर ?

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळाल्यानंतर सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला. बांधकामाच्या अनुषंगाने सल्लागार संस्थेच्या नेमणुकीसाठी ८ आस्थापनांनी निविदा भरल्या आहेत. हे सूत्र शासकीय स्तरावर प्रलंबित आहे.

राज्यातील निवासी आधुनिक वैद्य बेमुदत संपावर !

राज्यातील निवासी आधुनिक वैद्य १ ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर गेले आहेत. संपाच्या काळात सेंट जॉर्ज रुग्णालयात प्रशासन आणि निवासी आधुनिक वैद्य यांची ३ घंटे चर्चा झाली. या वेळी प्रशासनाकडून आधुनिक वैद्यांच्या मनधरणीचे प्रयत्न निष्फळ ठरले.

राज्यातील निवासी आधुनिक वैद्य आजपासून संपावर !

निवासी आधुनिक वैद्यांनी कोरोनाच्या काळात चांगली सेवा देऊनही त्यांच्या मागण्यांची पूर्तता न करणे, हे अयोग्य आहे. जर मागणी पूर्ण करायची नव्हती, तर निवासी आधुनिक वैद्यांना आश्वासन का दिले ? संपामुळे होणार्‍या हानीभरपाईचे दायित्व  कोण घेणार ?

‘पंतप्रधान डिजिटल आरोग्य मिशन’चे पंतप्रधान मोदी यांच्याकडून लोकार्पण

देशातील प्रत्येक नागरिकाला मिळणार ‘आरोग्य ओळखपत्र’ !

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या वेळी हंगामी स्वरूपात घेतलेल्या कर्मचार्‍यांना अद्याप वेतन नाही

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या वेळी हंगामी स्वरूपात भरती केलेल्या ४३० एम्.टी.एस्.(मल्टिटास्किंग) कर्मचार्‍यांपैकी बहुतेक जणांना गेल्या ५ मासांपासून वेतन मिळालेले नाही. या कर्मचार्‍यांना मासिक १७ सहस्र रुपये वेतन देण्यात येणार होते. हे वृत्त एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मान्यता

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (‘नॅशनल मेडिकल कमिशन’ने) अखेर मान्यता दिली.

सोलापूर येथील बोगस आधुनिक वैद्याचे पोलिसांना चकवा देत पलायन !

येथील रविवार पेठ येथील ‘जय हॉस्पिटल’मध्ये काम करणार्‍या बाळासाहेब नंदुरे या तोतया आधुनिक वैद्याला पोलीस शोधत आहेत. मागील ६ मासांपासून नंदुरे याने वैद्यकीय पदवी नसतांनाही रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले.

रामनाथ (अलिबाग) येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार !

येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मान्यता मिळाली आहे. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

कमरेला देण्‍याचे ‘इंजेक्‍शन’ हाताला दिल्‍याने हात लुळा पडला !

पिंपळकर यांच्‍यासारख्‍या सामान्‍य माणसावर अन्‍याय झाला, तर त्‍याला न्‍याय मिळवून देण्‍यासाठी आरोग्‍य केंद्राचे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी स्‍वतःहून पुढाकार घेऊन साहाय्‍य करायला हवे !

कोरोना उपचारासाठी ‘अणु तेल’ हे आयुर्वेदाचे औषध प्रभावी ! – नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्ड

हिंदूंना ‘गोमूत्र पिणारे’ आणि ‘रानटी संस्कृतीचे लोक’ म्हणून हिणवणारी अन् हिंदुत्वाचे उच्चाटन करण्यासाठी सरसावलेली विद्वान मंडळी आता चकार शब्दही काढणार नाहीत, हे लक्षात घ्या !