|

उमरखेड (जिल्हा यवतमाळ) – येथील उपजिल्हा रुग्णालयातील आधुनिक वैद्य हनुमंत धर्मकारे यांची ११ जानेवारी या दिवशी शेख ऐफाज शेख अब्रार (वय २२ वर्षे) याने गोळ्या झाडून हत्या केल्याचे उघड झाले. भावाच्या मृत्यूस हे आधुनिक वैद्यच उत्तरदायी आहेत, असे समजून मृत भावाचे कपडे घालून ऐफाज याने ही हत्या केली.
पोलिसांनी ४८ घंट्यांच्या आत गुन्हा उघडकीस आणून ऐफाज याने सय्यद तौसिफ (वय ३५ वर्षे), सय्यद मुस्ताक (वय ३२ वर्षे), शेख मोहसीन शेख कय्यूम (वय ३४ वर्षे), शेख शाहरूख शेख आरम (वय २७ वर्षे) यांच्या साहाय्याने त्याने हत्या केल्याचे उघड केले. मुख्य आरोपी शेख ऐफाज हा घटना घडल्यापासून पसार होता. त्याला मध्यप्रदेशातील धार येथून कह्यात घेण्यात आले. २ वर्षांपूर्वी त्याच्या भावाचा येथील चौकात अपघात झाला होता. त्या वेळी रुग्णालयात उपचारासाठी भरती केले असता त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूस आधुनिक वैद्य धर्मकारे कारणीभूत असल्याचा ऐफाज याचा आरोप होता. त्यामुळे त्याने धर्मकारे यांची हत्या केली, असे त्याने सांगितले.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)