उपचाराच्या वेळी रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यासाठी डॉक्टरांना दोषी ठरवता येणार नाही ! – सर्वाेच्च न्यायालय

उपचाराच्या वेळी रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यासाठी डॉक्टरांना दोषी ठरवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वाेच्च न्यायालयाने दिला. ‘रुग्णांवर उपचार करतांना त्यांच्या आयुष्याची निश्चिती कुठलाच डॉक्टर देऊ शकत नाही.

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर येथे २ लाखांहून अधिक भाविक उपस्थित !

कोरोना संसर्गामुळे २ वर्षांनंतर भरलेल्या कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर येथे पुन्हा एकदा भक्तांची मांदियाळी जमली आहे. अनुमाने २ लाखांहून अधिक भाविक शहरात आले आहेत.

सुविधांची वानवा असतांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चालू करण्याची घाई का ? – परशुराम उपरकर, राज्य सरचिटणीस, मनसे

सोयीसुविधा उपलब्ध केल्यानंतरच वैद्यकीय महाविद्यालय चालू करा, हेही का सांगावे लागते ?

फोंडा येथे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ कै. डॉ. मंजुनाथ देसाई यांना श्रद्धांजली !

श्री. अजित केरकर म्हणाले, ‘‘डॉ. मंजुनाथ देसाई या देव माणसाची जागा आणखी कुणी घेऊ शकेल, असे वाटत नाही. केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित करावे.’’

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पशूवैद्यकीय चिकित्सालयात वर्षभर औषधेच नाहीत !

वर्षभर औषधे उपलब्ध नसतांना अधिकार्‍यांनी साचेबद्ध उत्तरे देऊन वेळ मारून नेणे, योग्य वाटते का ? वर्षभर औषध नव्हती, तर लोकप्रतिनिधींचे साहाय्य घेऊन ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न का नाही केले ?

अतिशय प्रेमळ आणि ईश्वरभक्तीत रममाण होऊन इतरांनाही त्या आनंदात डुंबवणारे पू. (कै.) वैद्य विनय भावेकाका !

पू. वैद्य विनय भावे (वय ६९ वर्षे) यांनी देहत्याग केला. त्यांच्या सहवासात आलेल्या साधकांनी केलेले त्यांचे गुणवर्णन आणि त्यांना पू. भावेकाकांविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

पुणे जिल्ह्यात फ्लू रुग्णांच्या संख्येत यंदा लक्षणीय वाढ !

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ‘इन्फ्लूएंझा’ या विषाणूमुळे होणा‍र्‍या फ्लू आणि फ्लूसदृश विकारांचे प्रमाण वाढले आहे. यासाठीची लस उपलब्ध आहे; मात्र लस घेतल्यावर ताप, अंग दुखणे किंवा हातावर येणारी सूज यांसारख्या दुष्परिणामांची भीती बाळगून अनेक नागरिक लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत.

गोवा शासन १६ ऑक्टोबरपासून टेलिमेडिसीन सेवा चालू करण्याची शक्यता

या योजनेद्वारे दूरभाषवरूनच रुग्णांच्या आरोग्याची चौकशी करून त्यांना उपचाराची माहिती दिली जाईल. प्रत्यक्ष रुग्ण समोर नसतांनाही या योजनेद्वारे रुग्णावर उपचार करता येतील.

४ मास वेतन न मिळाल्याने सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील १७ वैद्यकीय अधिकार्‍यांचे त्यागपत्र !

कोरोना महामारीच्या काळात काम केलेले वैद्यकीय अधिकारी दुर्लक्षित. ‘गरज सरो वैद्य मरो’ ही म्हण सार्थ करणारे प्रशासन. वैद्यकीय अधिकार्‍यांवर त्यागपत्र देण्याची पाळी येणे प्रशासनासाठी लज्जास्पद.

चाकण (पुणे) औद्योगिक वसाहतीतील कामगारांमुळे स्थानिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा !

बहुतांश आस्थापनांतील कामगार लसीकरणासाठी येत आहेत; मात्र आस्थापनांनी सरकारच्या आदेशानुसार कामगारांना त्यांच्या निधीतून लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना रुग्णालयात लस उपलब्ध होईल.