सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अंतिमतः संमती मिळाली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांच्याकडून ही संमती देण्यात आली असून यामुळे गेले वर्षभर चालू असलेला ‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला संमती मिळणार कि नाही ?’, हा संभ्रम आता दूर झाला आहे.
या वैद्यकीय महाविद्यालयात एम्.बी.बी.एस्.च्या १०० विद्यार्थ्यांच्या एका तुकडीला शिक्षण घेता येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे हे महाविद्यालय होत आहे.
मध्यंतरी केंद्रीय समितीने वैद्यकीय महाविद्यालयाची पहाणी केली होती, त्या वेळी काही त्रुटी काढल्या होत्या; मात्र त्या त्रुटींची पूर्तता केल्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीत या महाविद्यालयाला संमती देण्यात आली.