साईबाबा संस्‍थानला अपकीर्त करण्‍यासाठी खोटी पोस्‍ट सामाजिक माध्‍यमावर प्रसारित !

साईबाबा संस्‍थान ( संग्रहीत छायाचित्र )

शिर्डी (जिल्‍हा नगर) – साईबाबा संस्‍थानने हज यात्रेसाठी ३५ कोटी रुपये दिले; मात्र राममंदिरासाठी पैसे दिले नाहीत, अशा आशयाची पोस्‍ट सध्‍या सामाजिक माध्‍यमावर प्रसारित झाली आहे; मात्र अशा प्रकारे कुठलाही निधी देण्‍याचे प्रावधान नसून साईबाबा संस्‍थानने या बातमीचे खंडण केले आहे.

( सौजन्य : SHIRDI TODAY )

साईबाबा संस्‍थानला अपकीर्त करण्‍याचे हे कारस्‍थान आहे. साईबाबा संस्‍थानने असा कुठलाही निधी दिला नाही. निधी देण्‍याचे प्रावधानच नाही, तसेच संबंधित सामाजिक प्रसारमाध्‍यमे आणि अपप्रचार करणारे यांवर न्‍यायालयीन कारवाई करणार असल्‍याचे साईबाबा संस्‍थानचे कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी म्‍हटले आहे.