२०० कोटी रुपयांच्या फसवणुकीसाठी तिहार कारागृहात अटकेत असणार्‍या सुकेश चंद्रशेखर याची विशेष बडदास्त

देशातील बर्‍याच कारागृहांची हीच स्थिती आहे, हे आतापर्यंत उघड झालेल्या अनेक घटनांमधून जनतेला वाटते ! ‘तिहार’ या देशातील प्रमुख कारागृहातील ही स्थिती देशासाठी धोकादायकच म्हणावी लागेल !

गेहलोत यांचे नक्राश्रू !

राजस्थान सरकारला खरेच भ्रष्टाचारमुक्त राज्य करायचे असेल, तर हिंदुद्वेष सोडून देऊन समाजाला नीतीमान करण्यासाठीही प्रयत्नरत रहावे लागेल, अन्यथा भ्रष्टाचाराविषयीचे गेहलोत यांचे केवळ नक्राश्रूच ठरतील !

आरोग्य विभागाचा गट ‘ड’चा पेपर फुटल्याचे सिद्ध !

साधी परीक्षा घेऊ न शकणारा आरोग्य विभाग जनतेचे आरोग्य काय सांभाळणार ?

गिर्ये आणि आचरा येथे सापडलेल्या चिनी बनावटीची संपर्क यंत्रणा असलेल्या नौकांची अनुज्ञप्ती ३ मासांसाठी रहित

या दोन्ही नौकांची अनुज्ञप्ती ३ मासांसाठी रहित करण्यासह दोन्ही मासेमारी नौकांना मिळून ३३ सहस्र ६०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, तसेच या नौकांवर पुढील कायदेशीर कारवाईही करण्यात येणार आहे.

सावर्डे येथे रात्रीच्या वेळी विनाअनुज्ञप्ती पक्षाचे कापडी फलक लावणार्‍या ‘तृणमूल काँग्रेस’च्या कार्यकर्त्यांना स्थानिकांनी रोखले

विनाअनुज्ञप्ती पक्षाचे कापडी फलक लावून ‘तृणमूल काँग्रेस’ने स्वतःचा रंग दाखवायला प्रारंभ केला, असेच म्हणावे लागेल !

फेसबूकवर ओळख झालेल्या २ अल्पवयीन मुलींचे मित्रांसमवेत पलायन !

२ अल्यवयीन मुली मैत्रिणीच्या वाढदिवसाला जात असल्याचे कारण सांगून घरातून बाहेर पडल्या आणि फेसबूकच्या माध्यमातून ओळख झालेल्या मित्रांकडे वर्धा रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी जाऊन तेथून पसार झाल्या.

माहिती अधिकार कार्यकर्ते नारायण नाईक यांच्यावर सांकवाळ पंचायतीसमोर जीवघेणे आक्रमण !

राज्यात अशा अराजकसदृश घटना पुन्हा न घडण्यासाठी शासनाने संबंधितांवर त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे !

पालकमंत्री अनिल परब यांच्या दापोली येथील ‘साई रिसॉर्ट’च्या अवैध बांधकामाची चौकशी चालू

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंत्री अनिल परब यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत साई रिसॉर्ट बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे.

कोरोना : जनतेला भोगाव्या लागणार्‍या यातनांना कारणीभूत कोण ?

काही दिवसांपूर्वी एका राज्यातील एक साधक कोरोनामुळे आजारी होते. रुग्णालयात उपचार घेत असतांना तेथील गैरप्रकारांमुळे त्यांना झालेला मानसिक त्रास, तसेच आर्थिक हानी आणि फसवणूक यांविषयी आलेले अनुभव त्यांच्याच शब्दांत दिले आहेत.

राष्ट्रीय, तसेच बहुराष्ट्रीय आस्थापनांतील ‘वर्क फ्रॉम होम’ (घरून कार्यालयीन काम करणे) संकल्पनेनुसार चाकरी (नोकरी) करतांना कर्मचार्‍यांची होत असलेली पिळवणूक !

एकूणच आस्थापने ‘वर्क फ्रॉम होम’च्या आडून कर्मचार्‍यांची काळजी घेत असल्याचे भासवत आहेत. प्रत्यक्षात ती त्यांच्या अडचणींचा विचार करत नसल्याचेच दिसत आहे !