राज्यात बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपी करणार्‍या ५८ विद्यार्थ्यांवर कारवाई !

राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी राज्यातील विविध विभागीय मंडळांच्या परीक्षा केंद्रांमध्ये इंग्रजी विषयाच्या परीक्षेत कॉपी केल्याचे ५८ प्रकार उघडकीस आले आहेत.

महाबळेश्वर येथील डान्सबारवर पोलिसांची धाड !

सातारा येथे वारंवार डान्सबारवर धाडी घालण्याची कारवाई करण्यात आली आहे. तरीही अश्लील नृत्याचे प्रकार चालूच आहेत. पोलीस कठोर कारवाई करत नसल्याचे हे निर्देशक आहे.

‘नवनीत’च्या प्रश्नसंचाच्या छायांकित प्रती विकणार्‍या तिघांना अटक !

विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

डान्सबारला पोलिसांचेच संरक्षण ! – विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेले आरोप खरे असतील, तर याची सरकारने गांभीर्याने नोंद घेऊन डान्सबार बंद करण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !

गोवा : संरक्षित स्मारकांचे अनुमतीविना चित्रीकरण केल्यास ५० सहस्र रुपये दंड

संरक्षित ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या स्थळी गेली काही वर्षे प्रत्येक वर्षी फेस्त (जत्रा) आयोजित केले जाते. त्यासाठी पुरातत्व विभागाची अनुमती घेतली जाते का ? आणि अनुमती असेल, तर त्यासाठी किती शुल्क आकारले जाते ?

Casino In Jatrotsav : इब्रामपूर (गोवा) येथील श्री सातेरीदेवीच्या जत्रोत्सवातील जुगाराला विरोध करणार्‍यांची नावे मंदिर समितीने फलकावर लावली !

जुगाराला समर्थन असणार्‍या मंदिर समित्या देवळात कधी पावित्र्य राखतील का ? वस्त्रसंहितेसह जत्रांमधून चालणार्‍या जुगाराच्या विरोधातही मोहीम राबवणे आवश्यक !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाची एम्.बी.ए.ची प्रश्नपत्रिका फुटली !

महत्त्वाच्या विषयांच्या प्रश्नपत्रिका कशा काय फुटतात ? यामुळे विद्यार्थ्यांना झालेला मनस्ताप आणि गेलेल्या वेळ कसा भरून निघणार ?

ठाणे येथे वेश्या व्यवसाय करणार्‍या दलाल महिलेला अटक

ठाणे येथील तीन पेट्रोल पंप या जुन्या आणि उच्चभ्रू लोकवस्तीमध्ये ‘फॅमिली सलोन आणि स्पा’ यांच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सिंधुदुर्ग : मनसेच्या शिष्टमंडळाची बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे मागणी

मालवण येथे नौदलदिनाच्या निमित्ताने केलेल्या कामांची सविस्तर माहिती द्या ! यासाठी केलेली काही कामे निविदा काढण्यापूर्वी करण्यात आल्याची चर्चा येथे चालू आहे. त्यानंतर घाईगडबडीत निविदांचे विज्ञापन देऊन निविदा काढण्यात आल्या.

डोंबिवली शहराजवळील खाडीतून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा !

मोठागाव, कोपर भागात, देवीचा पाडा, मेंग्या बाबा मंदिर येथे दिवस-रात्र अवैध रेती उपसा प्रचंड मोठ्या प्रमाणात चालू आहे. उल्हास खाडीतून तब्बल १० ते १२ सक्शन पंपांच्या साहाय्याने हा उपसा होत आहे.