Diwali Deepawali diwali 2023 deepawali 2023 Narakchaturdashi
पणजी, १५ नोव्हेंबर (वार्ता.) : मी नरकासुर प्रतिमा बनवण्याच्या कलेच्या विरोधात नाही, तर नरकासुर प्रतिमा स्पर्धांच्या निमित्ताने नागरिकांना मनस्ताप देण्याच्या प्रयत्नाच्या मी विरोधात आहे. यंदा नरकासुर प्रतिमा स्पर्धांच्या काळात जे अपघात झाले, त्यांत घायाळ झालेले सध्या बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहेत. या अपघातांचे दायित्व आता कोण घेणार आहे ? असा प्रश्न वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी उपस्थित केला आहे.
(सौजन्य : In Goa 24×7)
वीजमंत्री सुदिन ढवळीकर पुढे म्हणाले, ‘‘आमच्या लहानपणी आम्ही नरकासुराची एकच प्रतिमा बनवायचो. ही प्रतिमा एका रात्रीत बनवून पूर्ण व्हायची आणि पहाटेच्या अगोदर त्याचे दहन होत असे. त्या वेळी आम्ही कलात्मकतेला प्राधान्य देत होतो, तसेच परंपरेचाही सन्मान करत होतो. या निमित्ताने ‘वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा’, अशी भावना असायची; मात्र आज नरकासुर प्रतिमा बनवण्याच्या निमित्ताने वाईट प्रवृत्ती जाग्या होत आहेत की काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे. याला आपले लोकप्रतिनिधीच उत्तरदायी आहेत. ज्या दिवशी नरकासुर बनवण्यासाठी देणग्या देणे बंद होईल, तेव्हाच नरकासुराचे उदात्तीकरण करणे बंद होईल. आज जागोजागी कित्येक दिवस नरकासुर प्रतिमा बनवल्या जातात आणि त्या ठिकाणी धिंगाणा चालू असतो. हा प्रकार अयोग्य आहे. मागील २४ वर्षे मी ही विकृती नष्ट करून संस्कृतीचे संवर्धन करण्यास सांगत आहे. २ दिवस विविध वर्तमानपत्रांतील बातम्या वाचल्यानंतरही लोकही हेच सांगत असल्याचे दिसत आहे. लोकांमध्ये हळूहळू मतपरिवर्तन होत असल्याचे दिसत आहे.’’
हे ही वाचा –
♦ Narakasur-dahan Malpractice : गोव्यात नरकासुराच्या प्रतिमा जाळलेले अवशेष रस्त्यावरच !
https://sanatanprabhat.org/marathi/737629.html