नातेसंबंध संपून हिंसकता वाढत असल्याचे दर्शवणारे उदाहरण !
५ वर्षीय मुलाला मारणार्या मावशीवर गुन्हा नोंद !
नाशिक – मस्ती करणार्या ५ वर्षीय मुलाला लाथाबुक्क्यांनी मारून त्याच्या हातावर गरम तवा ठेवणार्या मावशीसह तिच्या यजमानांविरोधात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. या प्रकरणी आरती आणि विजय सदावर्ते यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अशांना आजन्म कारावासात डांबायला हवे !
बालिकेवर अत्याचार करणार्याच्या विरोधात गुन्हा नोंद !
अकोला – येथील २९ वर्षीय तरुणाने १४ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केला. सिगारेटचे चटके देत ब्लेडच्या साहाय्याने तिचे केस कापले. केशकर्तनालयात नेऊन तिचे मुंडन केले. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या महिला पदाधिकार्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या दिल्यानंतर पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा नोंदवला.
हिंसक वृत्तीचे धर्मांध !
लग्नासाठी मागे लागणार्या महिलेला मारहाण !
मुंबई – लग्नासाठी मागे लागल्याने विवाहित वासिम शेख याने महिलेला मारहाण केली. त्याने तिला शिवीगाळही केली. महिलेच्या भावाने तिला घायाळ अवस्थेत रुग्णालयात भरती केले. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.
कायदा-सुव्यवस्थेची ऐशीतैशी !
पबमध्ये वाद घालणारे पोलिसांच्या कह्यात
नागपूर – येथील एक पब परिसरात गुन्हेगारांच्या टोळीने वाद घातला. एका आरोपीने पिस्तूल काढले. शिवीगाळ केली. पबमध्ये मालकाने त्यांना येण्यास प्रतिबंध केल्याने तेथेही त्यांनी वाद घातला. टोळीतील आरोपींनी काही गुंड साथीदारांना बोलावून घेतले. यांपैकी काहींना पोलिसांनी कह्यात घेतले.
अशांना शिक्षाच करायला हवी !
जळगाव येथे विनाअनुमती शिकवणीवर्गाचे फलक लावणार्या मालकावर गुन्हा नोंद !
जळगाव – महापालिकेची अनुमती न घेता शिवकॉलनी थांब्यानजीक खासगी शिकवणीवर्गाचे मोठे फलक लावल्याप्रकरणी खासगी शिकवणी मालकाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी किरकोळ वसुली विभागाचे कर्मचारी वसंत भास्कर पाटील यांनी तक्रार दिली होती.