
मुंबई – सौदी अरेबियामधील रुग्णालयात नोकरी देण्याचे आमीष दाखवून दक्षिण मुंबईतील ७ तरुणांची फसवणूक करणार्या महंमद अबुतालीब सय्यद याच्याविरुद्ध सर जे.जे. मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंद केला. आरोपीने प्रत्यक्षात या तरुणांना तेथील कुक्कुटपालन व्यवसायात स्वच्छता कामगार म्हणून काम करण्यास भाग पाडले, तर उर्वरित दोघांचे पारपत्र जमा करून त्यांना परदेशात पाठवलेच नाही. या संपूर्ण प्रकारात पावणेनऊ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. आरोपीने अशा प्रकारे आणखी काही तरुणांची फसवणूक केल्याचा संशय असून या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.