हस्तरेषातज्ञ सुनीता शुक्ला यांनी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्तरेषांचे केलेले विश्लेषण !

ऋषिकेश (उत्तराखंड) येथील हस्तरेषातज्ञ सुनीता शुक्ला यांनी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्तरेषांचे केलेले विश्लेषण येथे देत आहोत. २२ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या डाव्या हातावरील रेषांचे विश्लेषण’ वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

(भाग २)

भाग १  वाचण्याकरीत येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/836267.html

हस्तरेषांचे संग्रहित रेखाचित्र

२. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या  उजव्या हाताच्या संदर्भातील विश्लेषण

व्यक्तीच्या उजव्या हातावरून तिच्या वर्तमान जन्माविषयी बोध होतो. ‘वर्तमान जन्मात व्यक्ती तिच्यातील क्षमतेचा उपयोग कशी करते ? तिच्यातील उणिवा ती कशी दूर करते ? तिचा आध्यात्मिक प्रवास कसा चालू आहे ? तिला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे ?’, इत्यादी गोष्टी उजव्या तळहातावरील रेषांवरून जाणता येतात.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

२ अ. गतजन्माच्या तुलनेत सद्गुरु डॉ. पिंगळे यांचे वर्तमान जन्मातील जीवन अधिक चांगले असणे : सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या उजव्या तळहाताचा अभ्यास केल्यावर लक्षात येते की, गतजन्मीच्या तुलनेत त्यांचे या जन्मातील जीवन अधिक चांगले आहे. ते त्यांच्यातील क्षमता योग्य प्रकारे उपयोगात आणत आहेत, तसेच स्वतःतील उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. (‘माझी साधना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या मार्गदर्शनानुसार होत आहे. ‘ती अधिक तीव्रतेने होणे आवश्यक आहे’, असे मला वाटते.’ – सद्गुरु डॉ. पिंगळे) त्यांचे बरेचसे संस्कार लोप पावले आहेत; परंतु ते अजून समूळ नष्ट झालेले नाहीत.

२ आ. वर्तमान जन्मात सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या साधनेला विलंबाने आरंभ होणे : सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या उजव्या तळहातावर दोन भाग्यरेषा (अध्यात्मरेषा) आहेत. त्यांपैकी एक त्यांच्या प्रारब्धानुसार असून दुसरी त्यांच्या क्रियमाणामुळे (साधनेमुळे) निर्माण झाली आहे. एक भाग्यरेषा शिवाकडून आणि दुसरी शक्तीकडून प्राप्त झाली आहे. भाग्यरेषांचा अभ्यास केल्यावर ‘या जन्मात सद्गुरु डॉ. पिंगळे यांची साधना विलंबाने (वय वर्षे ३८ च्या सुमारास) आरंभ झाली’, असे लक्षात येते. (‘वयाच्या २८-२९ व्या वर्षी साधनेला आरंभ झाला.’ – सद्गुरु डॉ. पिंगळे) वयाच्या ३८ व्या वर्षानंतर एखादी विशेष घटना घडल्याने त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली असावी. (‘व्यवहाराविषयी प्रारंभीपासून असलेली विरक्ती आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचा माझ्या जीवनात झालेला प्रवेश, हे याला कारणीभूत होते.’ – सद्गुरु डॉ. पिंगळे) हे त्यांच्या मागील जन्मीच्या साधनेमुळे आणि शिव-शक्ती यांच्या आशीर्वादामुळे झाले. मागील जन्मात त्यांचा खुंटलेला साधनाप्रवास या जन्मी पुन्हा चालू झाला. यामागील कारण, म्हणजे गुरूंच्या आशीर्वादासमवेत सद्गुरु डॉ. पिंगळे यांचे असलेले ‘प्रयत्न, तळमळ आणि दृढनिश्चय’ हे होय. (‘प्रत्येक जन्मात मी गुरुदेवांची सेवा करत होतो’, असे मला वाटते.’ – सद्गुरु डॉ. पिंगळे)

२ इ. सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी ‘अर्धनारीश्वरा’प्रमाणे स्वतःला संतुलित ठेवले असणे : त्यांच्या उजव्या तळहातावरील हृदयरेषा अखंड, स्पष्ट आणि ठळक असून तिला शेवटी ‘त्रिशुळा’चा आकार प्राप्त झाला आहे. हे त्यांना शिवाचा आशीर्वाद असल्याचे दर्शक आहे. सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या अनाहतचक्राची शुद्धी झाली असून त्यांनी ‘अर्धनारीश्वरा’प्रमाणे (टीप) स्वतःला संतुलित केले आहे.

टीप – ‘अर्धनारीश्वर’ : शरिराच्या अर्ध्या भागात शिव आणि अर्ध्या भागात शक्ती असलेले शिवाचे एक रूप.

(‘साधनेपूर्वी नाही; पण सध्या माझे शरीर मला ‘अर्धनारीश्वरा’प्रमाणे वाटते. बर्‍याचदा माझे अर्धे शरीर उष्ण (ताप आल्यासारखे) आणि अर्धे शरीर थंड असते. अर्धी बाजू घामेजलेली अन् अर्धी बाजू कोरडी असते. आयुर्वेदाच्या वैद्यांनी त्या स्थितीला ‘अर्धनारीश्वर ज्वर’, असे म्हटले आहे. गुरुदेवांनी त्या संदर्भात सांगितले, ‘‘ही स्थिती एका नाडीच्या कृतीशीलतेमुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे शरिराच्या दोन्ही भागांमध्ये वेगवेगळ्या संवेदना जाणवतात.’’ आता मला आतून वाटते, ‘माझ्या अर्ध्या शरिरात शिव किंवा पुरुष आहे, तर अर्ध्या शरिरात शक्ती किंवा प्रकृती आहे अन् मी स्वतः नर किंवा नारी नसून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा अंश आहे.’ – सद्गुरु डॉ. पिंगळे)

२ ई. साधनेमुळे सद्गुरु डॉ. पिंगळे यांची कर्मबंधने आणि संस्कार न्यून होणे : त्यांच्या उजव्या तळहातावरील हृदयरेषेला कोणत्याही लहान रेषा भेदून खालच्या दिशेने गेलेल्या नाहीत; म्हणजे साधनेमुळे सद्गुरु डॉ. पिंगळे यांची कर्मबंधने आणि संस्कार न्यून झाले आहेत. त्यांच्या तळहातावरील शुक्र ग्रहाच्या उंचवट्यावरील रेषा फिकट आणि न्यून झाल्या आहेत. त्यांची हृदयरेषा ही तर्जनीपर्यंत (गुरु ग्रहाच्या बोटापर्यंत) आली आहे. सद्गुरु डॉ. पिंगळे हे आध्यात्मिक प्रवासातील आनंद अनुभवत असल्याचे हे दर्शक आहे. (‘गुरु’ म्हणजे सगुणातील गुरुदेव असून त्यांची माझ्या जीवनावर सत्ता आहे. मलाही ते हवे असून ‘त्यांनी मला त्यांच्यात विलीन करून घ्यावे’, ही माझी इच्छा आहे.’ – सद्गुरु डॉ. पिंगळे)

हस्तरेषातज्ञ सुनीता शुक्ला

२ उ. सद्गुरु डॉ. पिंगळे हे समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्नरत असणे : सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या डाव्या तळहातावरील मस्तकरेषेच्या तुलनेत उजव्या तळहातावरील मस्तकरेषा सुस्थितीत आहे. सद्गुरु डॉ. पिंगळे हे अतिशय संतुलित, बुद्धीमान, उत्तम स्मरणशक्ती लाभलेले, व्यवस्थित आणि विवेकी असून समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्नरत आहेत. (‘मी अभ्यासात, तसेच वैद्यकीय क्षेत्रातही सामान्यच होतो; परंतु साधना करतांना गुरुदेवांच्या कृपेने मला धर्मकार्य आणि अध्यात्मकार्य करता येत आहे. आपण वर सांगितलेली वैशिष्ट्ये या माझ्या अनुभूती आहेत.’- सद्गुरु डॉ. पिंगळे)

२ ऊ. सद्गुरु डॉ. पिंगळे हे चैतन्यमय आणि उन्नत जीव असणे ! : त्यांच्या उजव्या तळहातावरील जीवनरेषाही ठळक, लांब आणि दोषरहित आहे. यावरून लक्षात येते की, ते अतिशय चैतन्यमय आणि उन्नत जीव आहेत. त्यांना वयाच्या ९० वर्षांहून अधिक काळ आयुष्यमान आहे. वयाच्या ६० व्या वर्षाच्या सुमारास त्यांच्या जीवनात काही चांगले पालट होणार आहेत. (‘माझे आयुष्यमान कितीही असो; परंतु ‘माझा प्रत्येक श्वास, माझी नाडी आणि हृदयाचे ठोके हे गुरुसेवेत व्यतीत होऊ देत’, अशी प्रार्थना !’ – सद्गुरु डॉ. पिंगळे)

२ ए. सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या उजव्या तळहातावरील सूर्यरेषा लहान असली, तरी ती सरळ आणि ठळक आहे. त्यामुळे त्यांना कीर्ती आणि समृद्धी प्राप्त होईल.

२ ऐ. सद्गुरु डॉ. पिंगळे यांचे व्यक्तीमत्त्व ‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’ या उक्तीनुसार असणे : सद्गुरु पिंगळे यांच्या उजव्या हाताचा अंगठा हा डाव्या हाताच्या अंगठ्याच्या तुलनेत सुस्थितीत आहे. हे त्यांच्यातील प्रबळ इच्छाशक्ती, परिस्थितीशी जुळवून घेणे आणि निर्णयक्षमता या गुणांचे दर्शक आहे. त्यांचे विचार तर्कशुद्ध आहेत. ते समष्टीसाठी स्वतःचे धन व्यय करत आहेत. धन किंवा संपदा यांची त्यांना अभिलाषा नाही. ‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’ असे त्यांचे व्यक्तीमत्त्व आहे. (‘गुरुकृपा ही माझी संपत्ती असून ती वाटण्याचा मी प्रयत्न करत आहे.’ – सद्गुरु डॉ. पिंगळे)

२ ओ. सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या उजव्या हाताच्या बोटांचे विश्लेषण : सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या उजव्या हाताच्या बोटांच्या पेरांवरून त्यांच्यात व्यवस्थापन सांभाळण्याचे आणि कार्याला मूर्त रूप आणण्याचे कौशल्य असल्याचे लक्षात येते. ते पुष्कळ परिश्रमी आहेत. ते लोकांना चांगल्या प्रकारे हाताळतात आणि त्यांच्याकडून कार्य करवून घेतात. ते पारदर्शक आणि निर्मळ मनाचे आहेत.

२ औ. सद्गुरु डॉ. पिंगळे अजातशत्रू (ज्याला शत्रू उत्पन्न होत नाहीत, अशी व्यक्ती) असणे ! : सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या डाव्या हाताच्या तुलनेत त्यांच्या उजव्या हातावरील मंगळाचा उंचवटा उठावदार आहे. त्यामुळे त्यांच्यात महत्त्वाकांक्षा, ऊर्जावानता, कार्यतत्परता, योद्ध्याप्रमाणे कोणत्याही अडथळ्यांवर मात करण्याची क्षमता इत्यादी मंगळ ग्रहाशी संबंधित वैशिष्ट्ये आहेत. ते अजातशत्रू आहेत. त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींचे आणि सभोवतालच्या परिस्थितीचे ते जणू संरक्षक आहेत. (‘वर्ष १९८५ मध्ये मी इयत्ता १२ वी उत्तीर्ण झालो, तेव्हा एका कौटुंबिक कार्यक्रमात माझ्या एका ज्योतिषमित्राने स्वतःहून माझे भविष्य सांगितले होते. त्याने सांगितले, ‘‘तुझ्या जन्मकुंडलीत मंगळ ग्रह पुष्कळ बलवान असल्यामुळे तू सैन्याधिकारी किंवा शल्यविशारद वैद्य होशील किंवा अध्यात्मात पुष्कळ प्रगती करशील.’’ – सद्गुरु डॉ. पिंगळे)

(समाप्त)

– सुनीता शुक्ला, हस्तरेषातज्ञ, ऋषिकेश, उत्तराखंड. (६.५.२०२४)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक