Burqa Ban In Kyrgyzstan : किर्गिस्तान या इस्लामी देशात महिलांना बुरखा आणि हिजाब परिधान करण्यावर बंदी

शरीयत कायद्यामध्ये बुरखा घालण्याची तरतूद नसल्याचा दावा

(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र)

बिश्केक – मध्य आशियातील किर्गिस्तान या इस्लामी देशामध्ये महिलांना बुरखा आणि हिजाब परिधान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ‘बुरखा आणि हिजाब यांच्या आड आतंकवादी लपलेले असू शकतात’, असा किर्गिस्तान सरकारचा दावा आहे. ‘यामुळेच महिलांनी हिजाब घालून रस्त्यावर चालू नये’, असा निर्णय किर्गिस्तान सरकारने घेतला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाची तरतूद केली आहे.

१. किर्गिस्तानमधील मुसलमानांच्या अध्यात्मिक प्रशासनाने (‘मुफ्तयात’ने) सरकारच्या प्रस्तावाला स्वीकृती दिली आहे. ‘ज्या महिला संपूर्ण शरीर झाकून चालतात, त्या परग्रहावरील जीव वाटतात. त्यामुळे महिलांनी केवळ चेहरा झाकून चालावे’, असे ‘मुफ्तयात’ने म्हटले आहे.

२. शरीयत कायद्यामध्ये डोक्यापासून पायापर्यंत शरीर झाकणे अनिवार्य करण्यात आलेले नाही. त्यामुळे अशा निर्णयाच्या विरोधात फतवा काढला जाऊ शकत नाही.

३. सर्व लोकांनी सरकाराचा आदेश तात्काळ मान्य करावा. सरकारने सुरक्षेच्या कारणांमुळे असा निर्णय घेतला आहे. सरकारचे म्हणणेही ऐकले पाहिजे; कारण बुरख्यावर बंदी घातली नाही, तर गुन्हेगारी वाढू शकते’, असे मुफ्तयातने म्हटले आहे.

नियम मोडणार्‍यांना कठोर शिक्षा

गुन्हेगार बुरख्याचा दुरुपयोग करत आहेत. याविषयीची अनेक उदहारणे समोर आली आहेत. बुरखा आणि हिजाब यांच्यावरील बंदीचे उल्लंघन करणार्‍यांना कारावासाची शिक्षा, तसेच २० हजार सोम (किर्गिस्तानचे आर्थिक चलन) दंड ठोठावण्याची तरतूद आहे. जानेवारी २०२५ मध्ये सरकारने हा कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला होता. देशाच्या राष्ट्रपतींनी बुरखा घालणार्‍यांच्या विरोधात विशेष अभियान चालवण्याचे सूतोवाच केले आहे. किर्गिस्तानात ९० टक्के लोकसंख्या मुसलमान आहे. इथे सुन्नी मुसलमानांची संख्या अधिक आहे.

संपादकीय भूमिका

  • इस्लामी देशात बुरखा आणि हिजाब यांवर बंदी घातली जाते, तर निधर्मी भारतात हे का शक्य नाही ?
  • नेहमी शरीयतचे नाव घेत मुसलमान महिलांना बुरखा परिधान करणे बंधनकारक असल्याचे सांगितले जाते. याविषयी मुसलमानांना काय म्हणायचे आहे ?