४ महिन्यांच्या बाळाचीही सुंता करण्याचा प्रयत्न

लक्ष्मणपुरी – राज्यातील मीरा सराय येथील रहिवासी असलेला राजकुमार (वय २४ वर्षे) या तरुणाचा विवाह शेखूपूरची रहिवासी असलेली मुसलमान तरुणी अफरोज (वय २३ वर्षे) हिच्याशी ४ ऑगस्ट २०२३ या दिवशी झाला होता. त्यांना ४ महिन्यांचा मुलगाही आहे; मात्र आता अफरोज तिच्या पतीवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप होत आहे. माझी आणि माझ्या ४ महिन्यांच्या मुलाची सुंता करण्यासाठी अफरोज अन् तिचे नातेवाईक दबाव आणत आहेत, असा आरोप या तरुणाने केला आहे. ‘मला इस्लाम स्वीकारायचा नाही आणि माझ्या मुलालाही मी इस्लाम स्वीकारू देणार नाही , असे या तरुणाने म्हटले आहे. त्याने पोलिसांकडे संरक्षण मिळण्याची मागणी केली आहे. हा तरुण आचारी म्हणून काम करतो.
१. विवाहानंतर तरुणीच्या कुटुंबियांनी राजकुमार याच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणला, त्याला मशिदीमध्ये नेण्यात आले. त्याच्याकडून बलपूर्वक नमाजपठण करून घेण्यात आले. त्यानंतर त्याला मांसही खाऊ घालण्यात आले. जेव्हा या सर्व गोष्टीला त्याने विरोध केला, तेव्हा अफरोज हिने त्याला घटस्फोट दिला; मात्र पुन्हा त्यांची मध्यस्थी झाली आणि वर्ष २०२४ पासून ते दोघे एकत्र राहू लागले.
२. ईदनिमित्त जेव्हा राजकुमार त्याच्या सासुरवाडीला गेला, तेव्हा त्याने पाहिले की, त्याच्या पत्नीचे नातेवाईक मुलाला मांस खाऊ घालत होते. त्यास त्याने विरोध केल्यावर अफरोज हिने मौलान आणि अन्य नातेवाईक यांना बोलावले आणि तिने राजकुमार याच्यावर पुन्हा इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणला. त्याची सुंता करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी राजकुमार त्याच्या मुलाला घेऊन तिथून पळून गेला.
संपादकीय भूमिकाकेवळ मुसलमान तरुणच नव्हे, तर मुसलमान तरुणीही लव्ह जिहाद करून हिंदु तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करतात, हे लक्षात घ्या ! |