पाकच्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा अधिकारी हुतात्मा

सीमा सुरक्षा दलातील एक उपनिरीक्षक पाओतिंसत गुइते हुतात्मा , पाकला नष्ट केल्याविना या घटना थांबणार नाहीत !

अंतर्गत प्रकरणांत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नका ! – भारताची कॅनडाच्या पंतप्रधानांना समज

कॅनडामध्ये मोठ्या संख्येने शीख धर्मीय रहातात आणि देहली येथे आंदोलन करणारे शेतकरी मोठ्या संख्येने शीख असल्याने ट्रुडो यांनी मतांच्या लांगूलचालनासाठीच या आंदोलनावर भाष्य केल्याचे लक्षात येते !

अन्न आणि औषध प्रशासनाकडून (एफ्.डी.ए.) पुणे विभागात पावणेचार कोटींचा अन्नसाठा जप्त

नागरिकांच्या आरोग्याचे महत्त्व लक्षात घेऊन कोरोना काळातच नव्हे, तर नियमितपणे एफ्.डी.ए.कडून अशी मोहीम राबवली जावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.

कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार उपस्थितांची संख्यामर्यादा हवी – उच्च न्यायालय

सध्या लग्नसमारंभांत ५०, तर अंत्यसंस्कारात २० व्यक्ती सहभागी होण्यास अनुमती आहे.

सनातनचे हितचिंतक आणि धर्मप्रेमी उद्योजक श्री. संजय ठाकूर यांची करणी सेनेच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

हिंदूंचे संघटन करण्यासाठी देवाने मला दिलेली ही संधी आहे आणि तिचा मी पूर्ण लाभ घेण्याचा प्रयत्न करणार आहे.= श्री. संजय ठाकूर

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी अत्यंत चुरशीने मतदान ; नोटा पर्याय उपलब्ध नाही

पुणे आणि सांगली विभागात विक्रमी मतदान झाले !

जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीसाठी समितीची स्थापना

भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी भाजप शासनाच्या काळात राज्यात राबवण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेमध्ये अनियमितता आहे, असे भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांनी अहवालात म्हटले होते.

पैशांसह साड्यांची लाच मागणार्‍या सहकार अधिकार्‍यासह त्यांच्या मुलाला अटक

सोसायटीच्या दुरुस्तीसाठी ‘सिंकिंग फंड’ (दुरुस्ती निधी) वापरता यावा म्हणून दोन लाख रुपयांसह दोन साड्यांची लाच मागणारे सहकार अधिकारी भरत काकड आणि त्यांचा मुलगा सचिन काकड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे.

वाराणसी येथे पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत देवदिवाळी साजरी

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आल्यानंतर येथील ८४ घाटांवर १५ लाखांहून अधिक दीप प्रज्वलित करण्यात आले.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे मानसिक आरोग्य पडताळण्यासाठी आरोग्य कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्याचा शासनाचा आदेश

राज्यातील प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णाची मानसिक पडताळणी करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्यासाठी आधुनिक वैद्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. ही पडताळणी कशा प्रकारे करावी, याविषयीचा अहवाल या समितीने नुकताच शासनाकडे सादर केला आहे.