|
सिंधुदुर्ग – आरोग्यास अपायकारक असणार्या गुटख्याची जिल्ह्यात राजरोस विक्री होत आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस यांच्या सहकार्यानेच हा व्यवसाय चालू आहे. हा व्यवसाय तात्काळ बंद करावा अन्यथा राज्य सरकारने २६ जानेवारी या प्रजासत्ताकदिनापासून सिंधुदुर्ग जिल्हा गुटखा विक्री केंद्र म्हणून घोषित करावा, या मागणीसाठी महालक्ष्मी दिव्यांग आणि निराधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला आहे.
याविषयी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुटखा राजरोसपणे विकला जात आहे. शासनाने बंदी घातलेली असतांनाही पोलीस आणि प्रशासन यांच्या संगनमताने कर्नाटक राज्यातून हा गुटखा आणला जात आहे.