अंबरनाथ-बदलापूर स्थानकांच्या दरम्यान रेल्वेरूळ दुरुस्त करणारे यंत्र रुळावरून घसरले, १ ठार २ जण घायाळ

मध्य रेल्वेची अंबरनाथहून कर्जतच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत

ठाणे – रेल्वेरूळ दुरुस्त करणारे यंत्र २७ जानेवारीच्या पहाटे ४ वाजताच्या सुमरास अंबरनाथ-बदलापूर या स्थानकांच्या दरम्यान रुळावरून घसरून झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे, तर २ जण घायाळ झाले आहेत. घायाळांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. या अपघातानंतर मध्य रेल्वेची अंबरनाथहून कर्जतच्या दिशेने जाणारी रेल्वे वहातूक खोळंबली होती. ६ घंट्यांनंतर रेल्वेसेवा पूर्ववत झाली.  अत्यावश्यक सेवेसाठी कामावर जाणार्‍या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला.